Instructions to Bhujbal officials to deliver ration grains to poor families nashik news esakal
नाशिक

Chhagan Bhujbal News : गरीब कुटुंबांपर्यंत पोहोचवा रेशनचे धान्य; भुजबळांचे अधिकाऱ्यांना निर्देश

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal News : मुंबईतील आझाद मैदानावर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेतर्फे स्वस्त धान्य दुकानांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

संघटनेच्या शिष्टमंडळाच्या भेटीवेळी अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोणतेही गरीब कुटुंब उपाशी झोपू नये म्हणून गरीब कुटुंबांपर्यंत रेशनचे धान्य पोहोचविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. (Instructions to Bhujbal officials to deliver ration grains to poor families nashik news)

शिष्टमंडळात आमदार विनोद निकोले, संघटनेच्या प्राची हतिवलेकर, मरियन ढवळे, नसीमा शेख, रेखा देशपांडे, पी. के. श्रीमंती यांचा समावेश होता. भुजबळ म्हणाले, की रेशनवर पूर्वी दोन ते तीन रुपये किलोने मिळणारे धान्य आता मिळत नाही, अशी तक्रार होती. प्रत्यक्षात मात्र हे धान्य मोफत देण्यात येत असल्याची माहिती शिष्टमंडळाला दिली.

तसेच, अनेक दुकानदार संपूर्ण धान्य न देता अर्धवट धान्य देऊन फसवणूक करीत असल्याच्या संघटनेच्या तक्रारीनुसार अशा दुकानदारांवर कारवाई करून त्यांचे दुकान निलंबित करू, असे आश्वासन दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रेशन दुकानात पूर्वी रॉकेल मिळत होते. मात्र, आता ते मिळत नाही. ते पुन्हा पूर्ववत झाले पाहिजे, अशी मागणी शिष्टमंडळाची होती.

त्यावर न्यायालयाने उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना रॉकेल देऊ नये, असे निर्देश दिले असल्याने त्यासाठी सरकारची न्यायालयीन लढाई सुरू आहे. याबाबत लवकर न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडून न्याय मिळवून देऊ असे आश्वासन भुजबळ यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT