Gangapur Dam esakal
नाशिक

Nashik Rain News : पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील विसर्गही घटविला; गंगापूरचा विसर्ग 9088 वरून 1252 क्यूसेस

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain News : जिल्ह्यात शनिवारी (ता. ९) सकाळपासूनच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गात कपात करण्यात आली.

गंगापूर धरणातून ९०८८ क्यूसेसवरून कपात १२५२ क्यूसेसने विसर्ग, नांदूरमध्यमेश्वर २४ हजार ५७९ क्यूसेसवरून विसर्ग कमी करीत १५ हजार ११४ क्यूसेस करण्यात आला. ( intensity of rain decreased discharge from dam decreased nashik rain news)

नाशिक जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ प्रकल्पांत ४९ हजार ४५८ दशलक्ष घनफूट म्हणजे ७५ टक्के पाणी आहे. गेल्या वर्षी या वेळी ६४ हजार १९५ दशलक्ष घनफूट म्हणजे ९८ टक्के पाणी होते. यंदा २३ टक्के अद्यापही कमीच आहे.

गंगापूरचा विचार केला तर सध्याच्या स्थितीत पाच हजार ३५३ दशलक्ष घनफूट ९५ टक्के इतका साठा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गेल्या वर्षीही या वेळी ९५ टक्के इतकाच साठा होता. गंगापूर समूहात नऊ हजार २२ दशलक्ष घनफूट म्हणजे ८९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

तरीही गेल्या वर्षीच्या ९७ टक्के साठ्यापेक्षा आठ टक्के पाणी कमीच आहे. दारणा धरणात सध्या ९६ टक्के पाणी उपलब्ध झाले आहे. गेल्या वर्षी धरण १०० टक्के भरले होते. दारणाच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. एक हजार ४०० क्यूसेसवरून त्यात ४६८ ने वाढ करीत एक हजार ८६८ क्यूसेस इतका करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT