intention of curing disease woman abuse nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : जादूटोणा, उताऱ्याच्या बहाण्याने टाकळीला महिलेवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : टाकळी विंचूर (ता. निफाड) येथील आजारी महिलेला जादूटोणा आणि उतारा करून आजार बरा करून देण्याच्या विचाराने महिलेशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लासलगाव पोलिसांनी संबंधित भोंदूला अटक केली आहे. (intention of curing disease woman abuse nashik crime news)

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः फिर्यादी महिला बारा-तेरा वर्षांपासून आजारी असून, बरेच उपचार घेतले. परंतु फरक पडत नसल्याने शेवटी तिने एका बाबाकडे उपचार सुरू केले. आरोपी किशोर संजय लोखंडे (रा. टाकळी विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक) याने जादूटोणा व उतारे करून आजार बरा करण्याचे आश्वासन दिल्याने फिर्यादी उताऱ्यासाठी महिलेच्या घरी जात होता.

किशोर लोखंडे यांनी २९ मेस दुपारी दोन ते तीनच्या सुमारास दुचाकीवरून महिलेला ‘तुझ्यासोबत काम आहे’, असे सांगून रेल्वेरुळाच्या कडेला शिवनदीच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ महिलेला नेले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तेथे फिर्यादीसोबत छायाचित्र काढले व ‘मी सांगेल तसे कर नाही तर, तुझे फोटो मी तुझ्या नातेवाइकांना पाठवून बदनामी करेल’, अशी धमकी देत फिर्यादीशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

कुणाला काही सांगितल्यास पतीला जादूटोणा करून मारून टाकण्याची धमकीही दिली. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, किशोर लोखंडे याला अटक केली आहे. महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनावाखाली उपनिरीक्षक सुरासे व देवीदास लाड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेसाठी गोपीचंद पडळकर मैदानात, जयंत पाटलांविरोधात फुकले रणशिंग

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT