SPPU university esakal
नाशिक

SPPU Vice Chancellor : पुणे विद्यापीठ कुलगुरुपदासाठी पुढील आठवड्यात मुलाखत; उमेदवारांची यादी जारी

सकाळ वृत्तसेवा

SPPU Vice Chancellor : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला लवकरच पूर्णवेळ कुलगुरू लाभण्याची शक्‍यता आहे. या संदर्भात कुलगुरू निवड समितीकडे प्राप्त अर्जांच्‍या छाननीनंतर २७ संभाव्‍य उमेदवारांची यादी जारी केलेली आहे.

या उमेदवारांच्‍या मुलाखती १८ व १९ मे रोजी मुंबई येथे घेतल्‍या जाणार आहेत. (Interview next week for Pune University Vice Chancellor List of candidates released nashik news)

पुणे विद्यापीठाच्‍या कुलगुरुपदाचा कार्यकाळ डॉ.नितीन करमळकर यांनी पूर्ण केल्‍यानंतर सध्या प्रा.डॉ.कारभारी काळे यांच्‍याकडे कुलगुरुपदाची प्रभारी जबाबदारी आहे. या दरम्‍यान राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार असताना कुलगुरू निवडीच्‍या प्रक्रियेसंदर्भात बदलांसाठी प्रयत्‍न सुरु होते.

यामुळे राज्‍यभरातील पारंपारिक विद्यापीठाच्‍या कुलगुरू निवडीची प्रक्रिया मंदावलेली होती. अखेर या प्रक्रियेला गती मिळालेली असून, पुणे विद्यापीठाच्‍या कुलगुरू निवडीसाठी प्रक्रियादेखील गतिमान झालेली आहे.

निवड समितीमार्फत पात्रताधारक उमेदवारांच्‍या नावांची यादी जारी केलेली आहे. या उमेदवारांच्‍या मुलाखतीची प्रक्रिया १८ व १९ मे दरम्‍यान इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी), पवई येथे पार पडणार आहे.

यानंतर समितीमार्फत राज्‍यपालांना संभाव्‍य पाच उमेदवारांच्‍या नावाची शिफारस केली जाईल. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्‍यपाल रमेश बैस हे या उमेदवारांची मुलाखत घेताना कुलगुरुपदासाठी उमेदवारांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब करतील.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मुलाखतीस बोलाविलेले उमेदवार- पुणे विद्यापीठातील संजीव सोनवणे, इनव्‍हायरमेंट सायन्‍स विभागाचे प्रमुख सुरेश गोसावी, डिफेन्‍स ॲण्ड स्ट्रॅटेजिक स्‍टडीजचे विभाग प्रमुख विजय खरे, गणित विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक विलास खरात, ह्यूमन स्‍टडीज्‌ विभागाच्‍या प्रमुख प्रा.अंजली कुराने, रसायनशास्‍त्र विभागाचे प्रमुख अविनाश कुंभार,

भौतिकशास्‍त्र विभागाचे प्रमुख संदेश जडकर, भौतिकशास्‍त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक संजय ढोले, बायोटेक्‍नॉलॉजी विभागाचे प्रा. राजू गच्‍छे यांचा समावेश आहे.

जळगावच्‍या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागाचे प्रमुख प्रा. अशोक महाजन, इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी विभागाचे प्रमुख बी.व्‍ही. पवार, मराठी विभागातील वरिष्ठ प्राध्यापक एम.एस. पगारे यांचाही समावेश आहे.

औरंगाबादच्‍या डॉ.बी. ए. एम. युनिव्‍हर्सिटीतील बॉटनी विभागाचे प्रमुख प्रा.अशोक चव्‍हाण, नांदेडच्‍या स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू उद्धव भोसले, स्‍कूल ऑफ अर्थ सायन्‍सचे वरिष्ठ प्राध्यापक दीपक पानसकर यांच्‍यासह मुंबई विद्यापीठातील मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स ॲण्ड पब्लिक पॉलिसीच्‍या संचालिका डॉली सन्नी,

याच विद्यापीठातील इन्‍स्‍टिट्यूट ऑफ डिस्‍टंस ॲण्ड ओपन लर्निंगचे संचालक पी. ए. महानवर तसेच कोल्‍हापूरच्‍या शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्‍त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक संजय चव्‍हाण, वाणिज्‍य व व्‍यवस्‍थापनशास्‍त्र विभागाचे अधिष्ठाता श्रीकृष्ण महाजन,

भौतिकशास्‍त्र विभागाचे वरिष्ठ व्‍यवस्‍थापक विजय फुलारी, उस्‍मानाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी कॉलेज येथील रसायनशास्‍त्र विभागाचे प्रा. धनंजय माने, औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पर्यावरण विज्ञान विभागाचे प्रमुख एम. बी. मुळे,

नांदेडच्‍या यशवंत महाविद्यालयातील प्राचार्य गणेशचंद्र शिंदे, आकुर्डी येथील प्रो.रामक्रीष्णा मोरे कला, वाणिज्‍य व विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य मनोहर चासकर, सिंहगड बिझनेस स्‍कूलचे संचालक पराग काळकर,

रायगड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्‍नॉलॉजीकल युनिव्‍हर्सिटीतील प्रा.एस.बी. देवसकर, मुंबई विद्यापीठातील लाइफ सायन्‍स विभागातील प्रा. संजय देशमुख यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले आहे. Remarks : शहर व जिल्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT