Mysterious Death Case esakal
नाशिक

‘त्या’ संशयास्पद घटनेची चौकशी पूर्ण; निमोनियामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : निलगिरी बागेत राहणारे हिरामण महादू आहेर (४५) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी निलगिरी बागेतील मोकळ्या मैदानात जमिनीत पुरले होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या संशयास्पद घटनेची चौकशी सुरू केली.

मंगळवारी (ता. ९) दुपारी नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत पुरण्यात आलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला गेला. यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. यात निमोनिया मुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. (Investigation of that suspicious incident completed Death was found due to pneumonia nashik Latest Marathi News)

हिरामण आहेर हे मूळ नांदगाव तालुक्यातील रहिवासी असून, पंधरा वर्षांपासून ते निलगिरी बाग परिसरात वास्तव्यास आहेत. आंतरजातीय विवाह केल्यानंतर ते या ठिकाणी आपल्या पत्नी व दोन लहान मुलांसोबत राहत होते.

निलगिरी बाग येथे भंगार दुकानात काम करून हिरामण आहेर संसाराचा गाडा हाकीत होते. यातच काही दिवसांपासून त्यांच्या पायाला गँगरीन होऊन जखमेत जंतू झाले होते. त्यांना चालता येत नसल्याने घसरून ते बरेचशे आपले काम करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

अशातच शनिवारी (ता. ६) हिरामण आहेर यांचा मृत्यू झाल्याने, त्यांच्या कुटुंबीयांनी रात्रीच्या सुमारास निलगिरी बागेत मोकळ्या मैदानात रीतिरिवाजप्रमाणे मृतदेह जमिनीत पुरला असल्याचे सांगितले जात होते. याबाबत आडगाव पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांनी तहसीलदार व जिल्हा शासकीय रुग्णालय यांना पत्रव्यवहार केला. त्यानुसार मंगळवारी दुपारी नायब तहसीलदार नितीन पाटील, सर्कल ऑफिसर वसंत ढुमसे यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला.

यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचे शवविच्छेदन केले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे, वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT