Decoration of idols in ISKCON temple.
Decoration of idols in ISKCON temple. esakal
नाशिक

ISKCON Temple : विविध पुष्पांनी श्री श्री राधा मदन गोपालजींचा अभिषेक! मूर्ती प्राणप्रतिष्ठेस 12 वर्षे पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भगवान श्रीकृष्ण हे प्रेमाचे भुकेले आहेत व भक्तांद्वारे प्रेमाने अर्पण केलेले सर्व काही ते स्वीकार करतात, असे प्रतिपादन लोकनाथ स्वामी महाराज यांनी केले. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन), नाशिक द्वारा आयोजित पुष्पाभिषेक महोत्सवात त्यांनी भाविकांना उपदेश दिला. (ISKCON Temple Abhishekam of Sri Sri Radha Madan Gopalji with various flowers 12 years of Murthy Pranpratistha nashik news)

द्वारका येथील श्री श्री राधा मदन गोपाल (इस्कॉन) मंदिर येथे राधा मदन गोपालजींच्या प्राणप्रतिष्ठेला १२ वर्ष पूर्ण झाले व यानिमित्त राधा कृष्णाच्या विग्रहांचा पुष्पाभिषेक करण्यात आला. मंदिरात साजरा होणारा प्रसिद्ध महोत्सव असून आबालवृद्धांमध्ये आकर्षणाचा केंद्र ठरतो.

महोत्सवाला पहाटे पाचला मंगल आरतीपासून सुरवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद् भागवत प्रवचन झाले. सायंकाळी सहापासून मंदिरात कीर्तन सुरू होते व त्यानंतर लोकनाथ स्वामी महाराजांचे प्रवचन झाले.

यावर्षी तब्बल १००० किलो विविध पुष्पाच्या पाकळयांनी श्री श्री राधा मदन गोपालजींच्या विग्रहांचा अभिषेक करण्यात आला. मोगरा, गुलाब, चाफा, झेंडू, सोन चाफा, चमेली, बिजली तसेच वृंदावन आणि सोलापूरहून आणलेला देशी गुलाब, बंगलोरहून आणलेले सायली व मोगरा आदी फुलांचा अभिषेकासाठी वापर करण्यात आला.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

पुष्पांनी सजवलेली वेदी, नेत्रांना भुरळ घालणारे विग्रहांचे सुंदर मनोहर रूप, व श्रोत्यांना मंत्र मुग्ध करणारे लोकनाथ स्वामी महाराजांचे कीर्तन व प्रवचन हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गोपालानंद प्रभू, माधवकृष्ण प्रभू, मुकुंदरस प्रभू, लीलाप्रेम प्रभू, राजा रणछोड प्रभू, सहस्त्र शीर्ष प्रभू, जानकीनाथ प्रभू, सार्वभौम कृष्ण प्रभू, भगवान नृसिंह प्रभू, दाऊजी बलराम प्रभू, अक्षय एडके, सुमेध पवार, प्रिया गोरे माताजी, भोये माताजी, देसाई माताजी आदींनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT