corona suspected.jpg 
नाशिक

इटलीतून नाशिकला आलेल्या 'या' तरुणास 'कोरोना'चा संशय...!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : चीनसह जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना आजाराची लागण झाल्याच्या संशयावरून एका तरुणास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संशयिताच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल रविवारी (ता.1) सायंकाळपर्यंत प्राप्त होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, कोरोनाचा संशय असला, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले. 

कोरोनाच्या संशयातून त्यास जिल्हा रुग्णालयातील स्वतंत्र करोना विभागात दाखल

मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा 24 वर्षीय तरुण इटली येथे शिक्षण घेत असून, तो नुकताच भारतात परतला. मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या सर्वांचीच आरोग्य तपासणी होत आहे. त्यात तो निरोगी असल्याचे दिसून आले आहे. या तरुणाची बहीण नाशिकमध्ये राहत असल्याने तो शुक्रवारी (ता.28) बहिणीकडे आला. त्याला शनिवारी (ता 29) तीव्र सर्दीचा त्रास जाणवू लागला. तो युरोपियन देशातून आलेला असल्यामुळे कोरोनाच्या संशयातून त्यास जिल्हा रुग्णालयातील स्वतंत्र करोना विभागात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले असून, रविवारी त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. 
दरम्यान, अहवाल कसाही आला तरी, दक्षता म्हणून आरोग्य यंत्रणा त्याच्यावर चौदा दिवस लक्ष ठेवणार आहे. त्यानंतरच त्याची सुटका होईल. प्रथमदर्शनी वैद्यकीय तपासणीत करोनाचा संशय असला, तरी हे चित्र रविवारी अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. 

भारतात सध्या उष्ण वातावरण असल्यामुळे सूक्ष्म जीवाणूंचा प्रसार होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे संशय असला, तरी सर्दी आणि तत्सम रोग हे व्हायरल इन्फेक्‍शनमुळे होतात. त्यामुळे खात्री पटेपर्यंत नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन डॉ. जगदाळे यांनी केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT