Jal Jeevan Mission esakal
नाशिक

Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या कामांना 6 महिन्यांची मुदतवाढ

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी देण्यासाठी मार्च २०२४ ही अंतिम मुदत निश्चित केली होती.

सकाळ वृत्तसेवा

Jal Jeevan Mission : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी देण्यासाठी मार्च २०२४ ही अंतिम मुदत निश्चित केली होती.

मात्र, राज्यातील एकाही जिल्हा परिषदेला मुदतीत योजना पूर्ण करता येत नसल्याचे बघून आता पाणीपुरवठा मंत्रालयाने सर्व जिल्हा परिषदांना सर्व योजना पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०२४ पर्यंत म्हणजे सहा महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे. ()

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत १२२२ पाणीपुरवठा योजनांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यातील या १२२२ योजनांमध्ये आधी अस्तित्वात असलेल्या, पण नव्याने विस्तारीकरण केल्या जात असलेल्या रेट्रोफिटिंग योजनांची संख्या ६८१ असून, त्यांच्यासाठी ७१२ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे.

तसेच पूर्णत: नवीन असलेल्या पाणीपुरवठा योजनांची संख्य ५४१ आहे. या नवीन योजनांसाठी ६९७ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या कामांची तपासणीसाठी टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स या त्रयस्थ संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेने आतापर्यंत एक हजार ३० योजनांची किमान पहिली तपासणी केली आहे. तसेच ७३७ योजनांची दोनदा तपासणी केली आहे.

त्रयस्थ संस्थेकडून दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या योजनांची कामे साधारणपणे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. या आकडेवारीच्या आधाराने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दीड महिन्यात ८२१ योजना पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे. जिल्ह्यात ग्रामीण पुरवठा विभागाने मंजूर केलेल्या एक हजार २२२ योजनांपैकी जानेवारी अखेरपर्यंत २०४ योजना पूर्ण झाल्या आहेत.

यामुळे आता पुढील दीड महिन्यात केवळ ६१७ योजना पूर्ण करायच्या आहेत. त्यादृष्टीने नियोजन केले असून, हे उद्दिष्ट सहज साध्य होईल, असे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी सांगितले.

मार्चपर्यंत ८२१ योजना पूर्ण

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मार्च २०२४ पर्यंत सर्व योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, या विभागाच्या सध्याच्या कामांच्या प्रगतीवरून सप्टेंबर २०२४ पर्यंत सर्व योजना पूर्ण होणार असल्याचा दावा केला जात आहे.

त्यांच्या दाव्यानुसार मार्च २०२४ पर्यंत ८२१ योजना पूर्ण झाल्यानंतर जूनपर्यंत २७६ व सप्टेंबर २०२४ पर्यंत उर्वरित १२५ योजना पूर्ण होणार आहेत. यामुळे केंद्र सरकारने मार्च २०२४ पर्यंत ‘जलजीवन’ची कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत सहा महिन्यांनी पुढे ढकलली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT