Watergrass grown in Godavari river esakal
नाशिक

Nashik: जलपर्णीचा प्रश्न आ वासून, प्रशासनाचा कानाडोळा! पर्यावरणाचे नुसतेच सोहळे; मूळ समस्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष

जलपर्णीच्या वाढत्या पसऱ्याबरोबरच तिला काढण्यासाठी दरवर्षी खर्चाचे आकडे मोठे होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

चांदोरी : रासायनिक द्रव्ये, विनाप्रक्रिया नदीत सोडण्यात येणारे मैला पाणी, नाल्यांमधून येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे गोदावरी नदीचा नैसर्गिक समतोल ढासळला असून, जलपर्णीच्या विस्तारासाठी पोषक वातावरण होत आहे.

जलपर्णीच्या वाढत्या पसऱ्याबरोबरच तिला काढण्यासाठी दरवर्षी खर्चाचे आकडे मोठे होत आहेत. (Jalparni neglected by administration unforgivable neglect of basic problems at chandori Nashik)

दारणा सांगवी ते चांदोरी येथील गोदावरी नदीपात्रात जलपर्णी वाढू लागली आहे. त्याचा विपरित परिणाम गोदाकाठ भागातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. ही जलपर्णी हटवून नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवावे, अशी मागणी गोदाकाठी राहणाऱ्या रहिवाशांनी केली आहे.

गोदावरी नदीपात्रात जलपर्णीचे पुंजके फोफावताना दिसत असून, जलपर्णीमुळे डास-कीटकांचा त्रास गोदाकाठवासीयांच्या आरोग्यावर झाला आहे.

गेल्यावर्षी जून अखेरपर्यंत डासांच्या त्रासाचा सामना करावा लागला होता. जलसंपदा विभागाचे जलपर्णी हटविण्याचे काम ‘गोदावरी’ला आलेल्या महापुराने केले. महापुरात जलपर्णी वाहून गेली.

नदीपात्रात दरवर्षी जानेवारी वा फेब्रुवारीदरम्यान जलपर्णी निर्माण होते. नंतर मार्च व एप्रिलदरम्यान तिचा विस्तार इतक्या मोठ्या प्रमाणात होतो, की सर्वच अवघड होते. नदीत सर्वत्र जलपर्णीचेच साम्राज्य दिसू लागते.

दरवर्षी ही समस्या उद्भवत असेल, तर जलसंपदा विभाग मार्च, एप्रिल महिना उजाडण्याची वाट का पाहते? नागरिकांच्या व जलचर प्राण्यांच्या आरोग्याशी खेळ का करते, हेच समजत नाही.

लाखांची उड्डाणे

दारणा सांगवी, सायखेडा पूल, चांदोरी फरशी आणि मामलेश्वर गोंडेगाव येथे वेगळी वेगळी कमीत कमी २.५ लाख किंवा त्याहून अधिक रकमेची निविदा राबवत पानवेली काढली, असे दाखविली जाते.

मात्र, बहुतांशी पानवेली वाहते. पाण्याने वाहून जातेय. पारदर्शक पद्धतीने खर्च दाखविला जातो. मात्र, पानवेलीची समस्या मात्र मिटत नाही.

जलपर्णीचे तोटे

जलपर्णी पाण्याचा प्रवाह तर अडवतेच; पण तिच्या पाण्यावरील थरामुळे सूर्याची किरणे आणि ऑक्सिजन पाण्यात तळापर्यंत पोहोचत नाही.

पाणवठ्यांवर राहणाऱ्या पक्ष्यांना आवश्यक असलेले कीटक आणि जलचरांचे प्रमाण घटते. जलजीवांवर विपरित परिणाम होतो, तसेच जलपर्णीच्या मुळांच्या पोकळीत डास अंडी घालतात.

"दारणा सांगवी परिसरात साचलेल्या जलपर्णीमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. जलसंपदा विभाग जाणीवपूर्वक समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे."-सुवर्णा फड, सरपंच, दारणा सांगवी

"‘नेहमीच येतो पावसाळा’ याप्रमाणे पानवेलींची नेहमीचीच समस्या आहे. लोकसभा अन्‌ विधानसभेत प्रश्न उपस्थित होऊन चर्चा होते. मात्र, त्यावर कृती होत नसेल, तर गोदाकाठची समस्या आहे."-अश्‍पाक शेख, ग्रामपालिका सदस्य सायखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT