Officials of Raje Chhatrapati Pratishthan giving cash assistance for food donation to the old age home on the occasion of Dasakriya. esakal
नाशिक

Nashik News : ‘जंगलू’ला निरोप देताना कळवणकर भावूक; गिरणाकाठी अंत्यसंस्कार

रवींद्र पगार

कळवण (जि. नाशिक) : येथील बसस्थानकात रात्री- बेरात्री कधीही उतरले तर हमखास दिसणारा व्यक्ती म्हणजे ‘जंगलू’ होय. त्याला कुठे जायचेही नव्हते आणि त्याचे बाहेरुन येणारे देखील नव्हते. तरीही बसस्थानकच जणू त्याचे घर बनले होते. गेली अनेक वर्ष मिळेल ते काम करुन स्व:कष्टाने जीवन व्यथित करणाऱ्या जंगलूने कधी कोणासमोर भीक मागण्यासाठी हात पसरले नाही. त्याच्या या स्वाभिमानी स्वभावामुळेच तो कळवणसह परिसरातील अनेकांच्या ओळखीचा झाला होता.

पण, गेल्या आठवड्यात जंगलूने (वय ४९) कळवणला अखेरचा श्‍वास घेतल्याने अनेकांना गहिवरुन आले. मात्र, जंगलूचा न घरचा न दारचा पत्ता... त्यामुळे येथील राजे छत्रपती प्रतिष्ठान मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष साहिल मोतीराम पगार यांनी गिरणा नदीकाठी त्यांच्यावर स्वखर्चातून अंत्यसंस्कार केले. (jangloos funeral at Girna river shore by Raje Chhatrapati Pratishthan Mitra Mandal to Nashik Latest Marathi News)

येथील जंगलूबाबत शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मोतीराम पगार यांनी सांगितले, की जंगलूचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. कधीकाळी तो बिस्किट कंपनीत कामाला होता. मात्र, आजारपणात त्याच्या मेंदूवर परिणाम झाल्याने त्याने नोकरीला रामराम ठोकत थेट कळवण गाठले. कळवणकरांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे तो येथेच कायमचा रमला. स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी हॉटेलमध्ये काम करुन तर कधी मिळेल ते काम करुन दोन वेळच्या जेवणाची सोय करीत होता. बसस्थानकच त्याचे घर बनले होते.

त्यामुळे कळवणसह परिसरातून येणाऱ्या प्रवाशांना तो जणू ओळखीचाच झाला होता. कोविड काळातही त्याने बसस्थानक सोडले नाही. आदिवासी असलेल्या जंगलूला न कोरोना झाला न त्याने कुठला कोरोना प्रतिबंधक डोस घेतला. अगदी ठणठणीत असलेल्या जंगलूने गेल्या आठवड्यात (११ नोव्हेंबर २०२२) जगाचा निरोप घेतला. त्याच्या अकाली जाण्याची बातमी समजताच अनेकांनी बसस्थानक गाठले. तर काहींनी सोशल मिडीयातून त्याला श्रद्धांजली वाहिली. नंतर प्रश्‍न निर्माण झाला तो अत्यंसंस्काराचा.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

याचवेळी राजे छत्रपती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पगार यांनी पुढे येत जंगलूच्या भावाचा व बहिणींचा शोध घेवून त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. गिरणाकाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. रविवारी (ता. २०) त्यांच्या दशक्रियाविधीनिमत्त नांदुरी येथील वृद्धाश्रमात राजे छत्रपती प्रतिष्ठानतर्फे पगार यांनी अन्नदान करीत रोख स्वरुपात वृद्धाश्रमाला मदत देत जंगलूला श्रद्धांजली अर्पण केली.

"कळवण बसस्थानकात वास्तव्यास असलेला जंगलू कधीकाळी आमच्या हॉटेलमध्ये कामाला होता, असे वडिलांनी सांगितले. गेली अनेक वर्ष तो कळवणमध्ये वास्तव्यास असल्यामुळे त्याचे या शहराशी आणि येथील नागरिकांशी एक नाते जुळले होते. त्यामुळे त्याचे ऋण फेडण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे आम्ही त्याच्यावर अंत्यसंस्कार व दशक्रिया विधी केला."

- साहिल पगार, संस्थापक अध्यक्ष, राजे छत्रपती शिवाजी प्रतिष्ठाण, कळवण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT