Java Plum esakal
नाशिक

रसरशीत गुणकारी जांभुळ बाजारात दाखल

गोविंद अहिरे

नरकोळ (जि. नाशिक) : उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरामध्ये अमृतासमान कार्य करते. ग्रीष्म ऋतूत आंबा तर वर्षा ऋतूत जांभूळ हे अमृतफळ असते. लांब आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट- गोड व रसरशीत असतात.

जांभळांचा आस्वाद हा तृप्तिदायक, आल्हाददायक असतो. प्राचीन काळापासून भारतामध्ये ही वनस्पती आहे व तिचा आहाराबरोबरच औषधातदेखील समावेश केला आहे. अत्यंत कमी दिवसांचा मोसम असतो. शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर तसेच बागलाणच्या पश्‍चिम पट्यातील दाट जंगलात जांभळाची वृक्ष आढळतात. हे झाड ठिसूळ असल्याने फळ काढणे कसरतीचे असते. या पट्ट्यातून सकाळी आदिवासी बांधव गावरान आंब्याबरोबर विक्रीस आणतात. मधुमेह रुग्णतर काही खरेदीसाठी गर्दी करतात. उशिरा येणाऱ्या ग्राहकांना मात्र रिकाम्या हाताने परतावे लागते. सप्तश्रृंगगडावर यात्रेकरुंसाठी जांभुळसह आंबा, आवळा, करवंदे या फळाची विक्री होत असल्याने आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होतो. शहरात तर जांभळाचा मोठा खप असतो. जांभुळ १०० ते १२० रुपये किलोने विक्री होत आहे.

काय आहेत औषधी गुणधर्म

जांभूळ हे दीपक, पाचक, यकृत उत्तेजक व स्तंभक असते. पांडुरोग (अ‍ॅनिमिया), कावीळ, रक्तदोषाविकार या आजारांवर जांभळामध्ये नैसर्गिकरीत्या असलेल्या लोह तत्त्वामुळे लवकर गुण येतो. जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, ‘क’ जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. तर किंचित प्रमाणात ‘ब’ जीवनसत्त्व असते. यामध्ये प्रथिने, खनिजे, तंतूमय व पिष्टमय पदार्थ व थोड्या प्रमाणात मेद असतो. त्याचबरोबर कोलीन व फोलिक आम्लही त्यामध्ये असते. जांभळाचे पान हे उत्कृष्ट स्तंभक आहे. तसेच कोवळ्या पानात ‘ई’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे. जांभळाच्या बीयांमध्ये ‘ग्लुकोसाईड जांबोलिन’ हा ग्लुकोजचा प्रकार असल्यामुळे साखर वाढल्यावर हा घटक पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर करण्यावर आळा घालतो. म्हणूनच जांभूळ व त्याचे बी मधुमेह या आजारावर अत्यंत गुणकारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT