Jawan Amol Patil of Bolthan dies at Nepal border 
नाशिक

नाशिक : बोलठाणचे सुपुत्र जवान अमोल पाटील यांना नेपाळ सीमेवर वीरमरण

संजिव निकम

नांदगाव (जि . नाशिक) : बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे शुक्रवारी (ता. १४) सशस्त्र सीमा बलाच्या ४५ व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थी सैनिकांचे प्रशिक्षण सुरू होते. दरम्यान, ११ केव्ही उच्चदाब प्रवाहाच्या तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला. त्यात बोलठाण (ता. नांदगाव) येथील अमोल हिंमतराव पाटील (वय ३०) यांचा समावेश आहे.

या घटनेत एकूण दहा जण जखमी झाले. त्यांना बिरपूरच्या ललित नारायण उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौघा गंभीर जवानांना दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे. प्रशिक्षण मैदानावरील उच्चदाब प्रवाहाच्या तारा व खांब काढण्यासाठी सीमा सुरक्षा बलाने संबंधित वीज विभागाला अनेकदा पत्रे लिहूनही वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.
जवान अमोलच्या मृत्यूची बातमी समजताच बोलठाणसह नांदगाव तालुक्यावर शोककळा पसरली.

सशस्त्र सीमाबलाच्या बिहार-नेपाळ येथील सुपौलच्या बिरपूर सीमेवर कार्यरत असलेला अमोल सहकाऱ्यांसोबत सीमेवर तैनात होता. ऐन तारुण्यात अपघातात जखमी झालेला असताना केवळ जिद्द आणि चिकाटीमुळे अमोलची सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा दलात निवड झाली होती. नुकताच दिवाळीत अमोल बोलठाण येथे सुटीवर आला होता. या वेळी कन्यारत्न झाल्याचा आनंद सोहळा गावात स्नेहीजनांसोबत साजरा झाला. जाताना आई व पत्नी आणि आपल्या नऊ महिन्यांच्या चिमुकलीला सोबत घेऊन गेला होता. तारुण्यात वडिलांचे छत्र हरपलेल्या जवान अमोलच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे. अमोलचे पार्थिव बोलठाण येथे आणण्यात येणार असून, केंद्र व राज्य सरकार यांच्या कोविड नियमांच्या अधीन राहून त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी दिली.

अशी घडली घटना

प्रशिक्षण मैदानावरील टेन्ट काढण्यासाठीचे काम शुक्रवारी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास सुरू होते. ज्या ठिकाणी हे काम सुरू होते त्या प्रशिक्षण केंद्राच्या वरून जाणाऱ्या अकरा हजार उच्चदाब प्रवाहाच्या तारांशी संपर्क आल्याने एकच हलकल्लोळ उडाला. त्यात दहा जवान भाजले गेले. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनस्थळी धाव घेतली. यात तिघांचा मृत्यू झाला. त्यात अमोल पाटील यांच्यासोबत परशुराम सबर (वय २४) व महेंद्रकुमार बोपचे (२८) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT