Jawan Khandu Barkale esakal
नाशिक

Nashik News : आगासखिंड येथील जवान खंडू बरकलेंचा लेहमध्ये अपघातात जखमी झाल्याने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील अगासखिंड येथील सैन्यदलातील प्लाटून हवालदार खंडू भागुजी बरकले (51) यांना जम्मू काश्मीरमधील लेह येथे कर्तव्यावर असतांना मंगळवारी (दि.7) अपघात जखमी झाल्याने मृत्यू झाला असून (दि.12) त्यांचे पार्थिव विमानाने मुंबई येथे येणार आहे.

दुपारी 3 वाजता अगासखिंड येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, तीन भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. (Jawan Khandu Barkale of Agaskhind Martyred in Leh Nashik News)

शहिद बरकले हे सन 1991 मध्ये 12 वी नंतर ते सैन्यदलात भरती झाले होते. सन 2002 मध्ये डिफेन्स इन सिक्युुरिटी केडरमध्ये ते रुजू झाले होते. त्याअंतर्गत त्यांनी श्रीनगर, विशाखापट्टणम, ओझर मिग, जबलपूर, केरळ, आसाम येथे सेवा केली होती.

दोन वर्षांपूर्वी लेह येथील फिल्ड ऍमिनेशन डेपोमध्ये ते हवालदार म्हणून रुजू झाले होते व तेथेच कार्यरत होते. कोरोना काळात लेह येथे उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल त्यांना दोन पदके देऊन गौरविण्यात आले होते. नुकतेच ते नायब सुभेदार पदाची परिक्षाही उत्तीर्ण झाले होते.

मागील महिन्यात 9 फेब्रुवारी रोजी 15 दिवसांच्या सुट्टीवर ते गावी आले होते. सैन्यदलाकडून त्यांना पूणे येथे निवासस्थान देण्यात आले असून तेथे त्यांची पत्नी, बीडीएसला असणारी मुलगी रितू (24) व इंजिनीयर असणारा मुलगा ऋषिकेश (22) राहतात. 21 फेब्रुवारी रोजी सुट्टी संपवून ते लेह येथे गेले होते.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

22 फेब्रुवारी रोजी सकाळी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व तशी माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आली होती.

डोक्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना सैन्यदलाच्या चंदिगड येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांचे कुटुंबिय देखील पोहचले होते. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यापासून ते कोमातच होते. तेथे उपचार सुरु असतांनाच 7 मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली होती.

त्यानंतर त्यांचे भाऊ, पत्नी व कुटुंबीय अगासखिंडला परतले होते. सैन्यदलातील सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर (दि.12 ) सकाळी 6 वाजता सैन्यदलाचे विमान त्यांचे पार्थिव घेऊन मुंबईला येणार आहे.

तेथून कारने पार्थीव अगासखिंड येथे दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत आणण्यात येणार असून दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.अशी माहिती शासकीय यंत्रणेतून कळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : बालेकिल्ल्यातच मुश्रीफांना घेरण्याचा भाजपचा डाव; मुरगूड-गडहिंग्लजमध्ये दिग्गज नेत्यांची एन्ट्री, राजकीय वातावरण तापलं

SMAT 2025: 9 Fours, 7 sixes! अजिंक्य रहाणेचे वादळी अर्धशतक, सूर्याची फटकेबाजी; T20 सामन्यात संघाचा दणदणीत विजय

Kolhapur Politics : चंदगडमध्ये मानापमानाच्या नाट्याने ठाकरे गट एकाकी; आघाडी न मिळाल्याच्या आक्रमकतेमुळे, शिंदे गटाची राजकीय समीकरणे बदलली

Latest Marathi News Live Update : नसरापूरमध्ये दहशत माजवणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात!

Nashik Election : पाटलांचे भवितव्य मतदारांच्या हाती! दिनकर की दशरथ? मनसे-भाजप संघर्षात प्रभाग ९ चा कौल कोणत्या पाटलांना मिळणार, उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT