Jawan Sandeep Shinde of Yeola died in an accident at Kupwada while on duty  Sakal
नाशिक

येवल्याचे जवान संदीप शिंदे यांना वीरमरण; तालुक्यात शोककळा

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : भारतीय सैन्यदलात हवालदार या पदावर असलेले येथील संदीप अर्जुनराव शिंदे (Jawan Sandeep Shinde)यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. येथे आज शासकीय इतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच तालुक्यात दोन दिवसांपासून शोककळा पसरली होती. दिवंगत जवान संदीप शिंदे यांच्यामागे आई, वडील, पत्नी व दोन मुले आणि एक बहिण असा परिवार आहे. वीर जवान शिंदे यांचे पार्थिव आज (ता.१५) त्यांचे मूळ गाव असलेल्या येवला शहरात विठ्ठलनगर येथे आणण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी डोळ्यात अश्रूरुपी श्रद्धांजली वाहत प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. शहर पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान सजवलेल्या रथातून शिंदे त्यांची अंत्ययात्रा घरापासून अमरधाम येथे आणण्यात आली. यावेळी भारत माता की जय, अमर रहे अमर रहे, संदीप शिंदे अमर रहे अशा घोषणांनी त्यांना अंतिम निरोप दिला.

जवान शिंदे यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात पार पडला. याप्रसंगी तहसीलदार प्रमोद हिले उपस्थित होते. यानंतर नाशिक ग्रामीण पोलिस दल व शहर पोलिसांतर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे आदींनी आदरांजली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT