Jayakwadi Dam latest marathi news
Jayakwadi Dam latest marathi news esakal
नाशिक

Rain Update : जायकवाडी चौथ्या वर्षी ‘फुल्ल’ होणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) चौथ्या वर्षी ‘फुल’ होण्याच्या दिशेने निघाले आहे. मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार जायकवाडीमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा कमी साठा असल्यास नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरण समूहातून पाणी सोडावे लागते.

यंदा मात्र ती परिस्थिती राहणार नाही. संततधारेमुळे (Rain) नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जायकवाडीमधील जलसाठा शनिवारी (ता. १६) रात्री ६५ टक्क्यांच्या पुढे पोचला होता. आज सकाळपर्यंत हा जलसाठा ६७.४७ टक्के झाला आहे. (Jayakwadi will be full in fourth year Nashik Rain Update Latest maharashtra news)

जायकवाडीमधील उपयुक्त साठा ६५ टक्क्यांपर्यंत पोचण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंतची प्रतीक्षा करावी लागत होती. नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून आज सकाळपर्यंत २६.५८ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात जायकवाडीमधील जलसाठा ३७ टक्क्यांपर्यंत होता. नांदूरमध्यमेश्‍वरहून सोडण्यात येत असलेल्या पाण्याचे प्रमाण पाहता शनिवार (ता. १६)पर्यंत जायकवाडीमधील जलसाठा ६५ टक्क्यांपर्यंत पोचण्याचा अंदाज जलअभ्यासकांनी वर्तविला होता.

यासंबंधीचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, गोदावरी नदीत आज सकाळपर्यंत दारणा धरणातून ६.१०, गंगापूरमधून ३.८६, आळंदीमधून ०.३३, तर कडवामधून १.७६ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. नांदूरमध्यमेश्‍वरमधून आज सायंकाळी २९ हजार ६६७ क्यूसेक विसर्ग सुरू होता.

दारणामधून आठ हजार ८४६, कडवामधून एक हजार २९४, वालदेवीमधून ४०६, गंगापूरमधून दोन हजार ७५४, आळंदीमधून ४४७, भोजापूरमधून ५४० क्यूसेक पाणी सोडण्यात येत होते.

३८ वर्षांत नऊ वेळा १०० टक्के

(जायकवाडीमधील जलसाठ्याची स्थिती)

१९८३ पासून गेल्या वर्षीपर्यंतच्या ३८ वर्षांमध्ये जायकवाडी नऊ वर्षे १०० टक्के भरले आहे. त्यामध्ये १९९१, २००५, २००६, २००७, २००८, २००९, २०१९, २०२०, २०२१ या वर्षांचा समावेश राहिला.

वर्ष जलसाठा टक्क्यांमध्ये

१९८३ ९३.८७

१९८८ ९४.४

१९९० ९१

१९९५ ८८.१५

१९९९ ९७.९०

ऑगस्टमध्ये जोरदार हजेरीचा अंदाज

वरुणराजाने सततच्या हजेरीनंतर आता विश्रांती घेतली आहे. सूर्यनारायणाने दर्शन घडविले आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे खरिपाच्या उरलेल्या पेरण्या पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत. अशातच आगामी पावसाची स्थिती काय राहणार, याबद्दलची उत्सुकता आहे.

त्याअनुषंगाने हवामानशास्त्र अभ्यासकांशी संवाद साधल्यावर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर पाऊस चांगली हजेरी लावेल, असा अंदाज वर्तविला आहे. अभ्यासकांच्या माहितीनुसार ५ ऑगस्टपासून २० ते २५ ऑगस्टपर्यंत वरुणराजाचे राज्यात सर्वत्र चांगले आगमन अपेक्षित आहे.

आताच्या पावसामुळे धरणसाठा मोठ्या प्रमाणात झाला असून, अनेक धरणे १०० टक्के भरली आहेत. अशा परिस्थितीत आतासारखा ऑगस्टमध्ये संततधार अथवा जोरदार पावसाची हजेरी लागल्यास बहुतांश भागात पूरपरिस्थिती तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : 'राजधानी'त भिडणार दिल्ली-मुंबई, कोण जिंकणार?

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

New Rules From 1st May: 1 मे पासून बदलणार पैसे आणि बँकांशी संबंधित नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

SCROLL FOR NEXT