JEE MAIN Exam esakal
नाशिक

JEE दुसऱ्या सत्राच्‍या नोंदणीची शनिवारपर्यंत मुदत

अरूण मलाणी

नाशिक : जॉइंट एन्ट्रन्स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स (JEE Mains) परीक्षेच्‍या दुसऱ्या सत्राच्‍या नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे घेतला आहे. त्‍यानुसार आता विद्यार्थ्यांना शनिवार (ता.९) पर्यंत नोंदणी करता येईल. २१ जुलैपासून देशभरातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. (JEE second term registration deadline is Saturday Nashik News)

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जेईई मेन्‍सच्‍या दोन संधी उपलब्‍ध करून दिलेल्‍या आहेत. त्‍यानुसार नुकताच जेईई मेन्‍सची पहिल्‍या सत्रातील परीक्षा पार पडली. दुसऱ्या सत्रातील जेईई मेन्‍स परीक्षेला २१ जुलैपासून सुरवात होत आहे. दरम्‍यान या परीक्षेच्‍या नोंदणीसाठी ३० जूनपर्यंत मुदत दिलेली होती. परंतु विद्यार्थ्यांच्‍या हिताच्‍या दृष्टीने अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्‍हा खुली करण्यात आलेली आहे. त्‍यानुसार येत्‍या शनिवारी (ता.९) रात्री अकरापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. निर्धारित शुल्‍क भरण्यासाठी याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत मुदत दिलेली आहे.

जेईई मेन्‍समधून पात्रता मिळवत जेईई ॲडवास्‍ड परीक्षा घेतली जाणार आहे. त्‍याद्वारे इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये प्रवेश दिले जातील. राष्ट्रीय स्‍तरावर स्‍पर्धा असल्‍याने इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून सध्या कसून अभ्यास सुरु आहे.

जेईई-१ची उत्तरतालिका जाहीर

जूनमध्ये घेण्यात आलेल्‍या पहिल्‍या सत्रातील जेईई मेन्‍स परीक्षेची उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर येत्‍या आठवड्याभरात निकाल जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT