The fire that broke out at Jindal Polyfilm here on Sunday (1st) was announced to be extinguished on Thursday (5th) morning. esakal
नाशिक

Jindal Fire Accident : जिंदालमधील आग 60 तासांनंतर आटोक्यात; मातीचे ढिगारे उपसण्याचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा

घोटी (जि. नाशिक) : जिंदाल पॉलिफिल्म कंपनीमधील पॉली-१ प्लॉँटला लागलेली आग साठ तासांनंतर शमल्याचे पोलिसांनी जाहीर केले. घोटी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप खेडकर यांनी याबाबत माहिती दिली. (Jindal Fire Accident Fire in Jindal under control after 60 hours nashik news)

मुख्य प्लॉँटमधील आग ही दोन दिवसांपूर्वीच धोक्याबाहेर गेली होती, त्यानुसार प्लाँटची पाहणीदेखील अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र धुराचचे लोळ आकाशात झेपावताना कायम दिसत होते.

गुरुवारी संपूर्ण दिवसभरात सुरक्षितता म्हणून दोन बंब उभे ठेवण्यात आले होते. पोलिस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली परिसरातील मातीचे ढिगारे उकरण्याचे व संबंधित परिसर स्वच्छ करण्याचे कामकाज सुरू होते.

आग शमल्याचे दिसताच अग्निशमन दल, पोलिस अधिकारी यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. कंपनीचे आगीच्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत होते. यासाठी कंपनी व्यवस्थापन व पोलिस प्रशासन पंचनामे करण्यात व्यस्त होते.

प्लॉंट परिसरात दोन हायवा, ट्रॅक्टर, एक चारचाकी, दोन दुचाकी यांचे पूर्णतः नुकसान झालेले दिसून आले. पॉली-१ हा प्लॉँट आगीमुळे इमारतीसह पूर्णपणे नेस्तनाबूत झाला आहे. कंपनीमधील आजही अनेक प्लॉँट बंदस्थितीत होते.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

पोलिस यंत्रणेने कामगारांच्या यादीनुसार व घेतलेल्या माहितीनुसार अनेक कामगारांना व्हिडिओ कॉल करून सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली.

पाच दिवसांपासून महसूल, पोलिस, अग्निशमन दलाचे जवान तळ ठोकून होते. यातील अनेक कर्मचारी-अधिकारी यांना दुर्गंधीयुक्त हवेमुळे उलट्या, सर्दी, डोकेदुखीमुळे तब्येत बिघडल्याचे सांगण्यात आले.

भीषण घटना टळली

पॉली १ या प्लॉँटपासून अवघ्या वीस मीटरवर ज्वलनशील रासायनिक टाक्या होत्या. आग इथपर्यंत पोचली असती तर अनेक मैलांवरील परिस्थिती एखाद्या वायूगळतीच्या घटनेप्रमाणे झाली असती. मात्र त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात आग नियंत्रक यंत्रणा सक्षम असल्याने मोठी हानी टाळली.

"आग शमल्याने सर्वच यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. दिवसभर काही संशयित असे आढळते का याची पाहणी करताना मातीचे व प्लॉंस्टिक ढिगारे यांचा उपसा केला. आज अनेक कामगारांच्या घरी फोन लावून यादीनुसार कामगार सुरक्षित असल्याची खात्री पटली आहे."

- दिलीप खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक, घोटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT