seized Battery with Thief esakal
नाशिक

Nashik : मोबाईल टॉवर बॅटरी चोरीप्रकरणी संशयित ताब्यात

- युनूस शेख

जुने नाशिक : गंजमाळ येथील जिओ (JIO) कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या (Mobile tower) ३ अत्याधुनिक बॅटरी (Battery) चोरी झाल्याची घटना रविवारी (ता. १५) घडली होती. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करताच संशयितास ताब्यात घेण्यात आले. ६० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या तिन्ही बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या. (Mobile tower battery theft suspect arrested Nashik crime News)

भद्रकाली गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत गुन्हा दाखल होताच अवघ्या काही वेळातच गुन्हा उघडकीस आणून संशयित पांडू हनुमंत शिंगाडे (१८, रा. पंचशीलनगर गंजमाळ) यास ताब्यात घेतले. संशयित पंचशीलनगर येथे असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, कर्मचारी रमेश कोळी, धनंजय हासे, उत्तम खरपडे यांनी संशयितास ताब्यात घेत चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरीच्या बॅटरी काढून दिल्या. मंगळवारी (ता. १७) दुपारी संशयितास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

यापूर्वीही एसटी महामंडळ आगारातील उभ्या असलेल्या बसच्या, मोबाईल टॉवरच्या, पार्किंगमधील वाहनाच्या बॅटरी चोरी करण्याच्या अनेक गुन्हे यापूर्वी दाखल आहे. त्यातील संशयितांना त्या वेळी ताब्यात घेण्यात आले होते. तेदेखील पंचशीलनगर गंजमाळ याच भागातील असल्याचे निष्पन्न झाले होते. बॅटरी चोरांचा अड्डा म्हणून गंजमाळ परिसराची ओळख पोलिस ठाण्यात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT