Jio True 5G
Jio True 5G esakal
नाशिक

Nashik News : Jio True 5G आता मालेगावमध्ये!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मालेगाव शहर आज जिओ ट्रू ५G नेटवर्क शी जोडले गेले. याच वेळी १२ राज्यातील २५ शहरांमध्ये एकाच दिवशी ५G लाँच करून जिओ ने एकप्रकारे विश्वविक्रम केला. भारतामध्ये जिओ ५G उपलब्ध असलेल्या शहरांची संख्या ३०४ वर पोहोचली आहे

आजपासून जिओ वेलकम ऑफर मालेगावसह महाराष्ट्रातील जालना, बीड, धुळे आणि चाकण येथेही सुरू झाली. ऑफर अंतर्गत वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय १ Gbps+ वेगाने अमर्यादित डेटा मिळेल. (Jio True 5G now in Malegaon Jio first operator to launch service in malegaon Nashik News)

मालेगावशिवाय महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, जळगाव, सांगली, अकोला, चंद्रपूर, लातूर, परभणी इचलकरंजी आणि अहमदनगर येथे जिओ ५G सेवा सुरू करण्यात आली आहे.

जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, मालेगावमध्ये जिओ ची ५G सेवा सादर करताना आम्हाला आनंद होत असून मालेगाव शहरात ५G सेवा सुरू करणारा जिओ हा पहिलाच ऑपरेटर आहे. आम्ही जिओ ट्रू ५G तंत्रज्ञान त्याच्या विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह मालेगाव आणि महाराष्ट्रातील लोकांना प्रगत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात फायदा होणार आहे.

कृषी, शिक्षण, ई -गव्हर्नन्स, आयटी, एसएमई, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग आणि इतर अनेक क्षेत्रातही अनेक फायदे मिळतील. महाराष्ट्र डिजिटल करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत.

आजपासून, शहरातील जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय, १ Gbps+ पर्यंत स्पीडवर अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी जिओ वेलकम ऑफरसाठी आमंत्रित केले जाईल.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

जिओ ही एकमेव कंपनी आहे जिने ४G नेटवर्कवर शून्य अवलंबित्व असलेले स्टँडअलोन ट्रू ५G नेटवर्क तैनात केले आहे. स्टँडअलोन ट्रू ५G सह, जिओ नवीन आणि शक्तिशाली सेवा देऊ शकते जसे की कमी लेटन्सी कनेक्टिव्हिटी, मशिन-टू-मशिन कम्युनिकेशन, ५G व्हॉइस, एज कॉम्प्युटिंग आणि नेटवर्क स्लाइसिंग.

जिओ ट्रू ५G सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. त्यांना एक जिओ ५G नेटवर्क सुसंगत ५G हँडसेट, राहत्या/कामाच्या ठिकाणी ५G नेटवर्कची उपलब्धता तसेच प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी २३९ किंवा अधिक वैध सक्रिय योजनेवर असणे आवश्यक असेल. एकदा या निकषांची पूर्तता झाल्यानंतर, जिओ ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT