exam2.jpg
exam2.jpg 
नाशिक

जेएनयू, नेट सीईटी परीक्षांसाठी मुदतवाढ; परीक्षा केंद्र निवडीचीही मुभा

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोनामुळे सध्या परिस्थिती अद्यापही आटोक्‍यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी मिळावी, म्हणून नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पुन्हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची परीक्षा, तसेच यूजीसी-नेट परीक्षेसह अन्य परीक्षांसाठी आता तारखेपर्यंत अर्ज करता येतील, तर नीट परीक्षेच्या अर्जात दुरुस्ती, परीक्षा केंद्राच्या शहरात बदलाची संधीदेखील मिळणार आहे. 

आणखी एक संधी उपलब्ध

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स एक्‍झामिनेशन (जेएनयूईई) 2020 या परीक्षेसाठी 31 मेपर्यंत अर्ज करता येईल. इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च (आयसीएआर) 2020 यासाठी, यूजीसी नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (यूजीसी-नेट) जून 2020 आणि जॉइंट सीएसआयआर नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट जून 2020 या परीक्षेसाठीही 31 मेपर्यंत अर्ज सादर करता येणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे परिपत्रक जारी केले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) 2020 या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्जाची मुदत संपलेली आहे. या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती व परीक्षेच्या शहरात बदलाची यापूर्वी एकदा संधी दिली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना 31 मेपर्यंत अर्जात दुरुस्ती किंवा परीक्षा केंद्राकरिता शहराच्या निवडीत बदल करता येणार आहे. 

फाइन आर्टच्या अर्जासाठी 30 मेपर्यंत मुदतवाढ
 
राज्यस्तरावरील अभ्यासक्रमांच्या अर्जासाठीही मुदतवाढ मिळते आहे. यात बॅचलर ऑफ फाइन आर्ट या अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या सीईटीकरिता अर्ज करण्यास मुदतवाढ मिळालेली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता 30 मेपर्यंत अर्ज करता येईल. सीईटी सेलतर्फे या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT