death.jpg 
नाशिक

ह्रदयद्रावक! मरणानंतरही 'त्यांच्या' मरण यातना संपल्याच नाही...अन् अखेर

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (म्हसरूळ) हिरावाडीतील 50 वर्षीय व्यक्तीचे बुधवारी (ता. 13) राहत्या घरी आजाराने नैसर्गिकरीत्या निधन झाले. परिसरातील डॉक्‍टरांनी मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे मृत व्यक्तीचे कुटुंबीय मृतदेह घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात पोचले. तेथेही पोलिस पंचनामा असल्याशिवाय पुढील कार्यवाही केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. अखेर पंचवटी पोलिसांनी पोलिस पंचनामा दिला. त्यानंतर पुढील सोपस्कार पार पडले. या सर्व प्रकरणात त्या मृतदेहाची हेळसांड मात्र सुरूच राहिली. 

अशी आहे घटना

हिरावाडी येथील शिवकृपानगरमधील भोलेनाथ सोसायटीतील रहिवासी दिलीप सुधाराम गौड शर्मा (वय 50) यांचे बुधवारी (ता. 13) सकाळी नऊला निधन झाले. त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असताना कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या परिस्थितीत परिसरातील एकाही डॉक्‍टरांनी शर्मा यांच्या कुटुंबीयांना मृत्यू प्रमाणपत्र दिले नाही. मृत्यूचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे शक्‍य नसल्याने शर्मा कुटुंबीयांची अडचण वाढली. शर्मा कुटुंबीयांनी नगरसेविका प्रियंका माने यांच्याशी संपर्क साधून आपली अडचण सांगितली. मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला काहींनी दिला. मात्र, मृतदेह घेऊन जाण्यास खासगी रुग्णवाहिका चालक नकार देत होते. अखेर नगरसेविका माने यांनी महापालिकेची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. येथे तातडीने सर्व शासकीय काम पूर्ण होऊन अंत्यविधी होईल, असे शर्मा कुटुंबीयांना वाटत असताना येथेही अडचणी आल्या. जिल्हा रुग्णालयात पोलिस पंचनामा अथवा डॉक्‍टरांकडून प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली. दोन्ही गोष्टी शर्मा कुटुंबीयांकडे नसल्यामुळे मृतदेह जिल्हा रुग्णालयात घेण्यात आला नाही. त्यामुळे रुग्णावाहिका रुग्णालयाबाहेरच उभी ठेवण्यात आली. 

अखेर धनंजय माने यांनी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्याशी संपर्क साधत घडलेला सर्व प्रकार सांगितला. श्री. भगत यांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरांशी संपर्क साधून पोलिस पंचनामा देण्याची व्यवस्था केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास मृतदेह नेण्यात आला होता. तो दुपारी साडेचारला जिल्हा रुग्णालयात घेण्यात आला. इतका वेळ मृतदेहाची हेळसांड झाल्याने शर्मा कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup Schedule : प्रतीक्षा संपली! वन डे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; India vs Pakistan सामना कधी व केव्हा; जाणून घ्या टीम इंडियाचे टाईमटेबल

HDFC Bank: एचडीएफसी बँकेला मिळाले नवे प्रमुख! अनूप बागची सांभाळणार एमडी आणि सीईओ पदाची धुरा

ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

Sugar Price Hike : साखरेचे दर पुन्हा वाढणार की कमी होणार? केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; व्यापाऱ्यांची कोंडी होणार

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

SCROLL FOR NEXT