kadaknath2.jpg
kadaknath2.jpg 
नाशिक

Success Story : 'कडकनाथ'ची बातच न्यारी! पैसेही मिळाले अन् थेट २० हजार कोंबड्यांपर्यंत पोचला व्यवसाय

मुकुंद पिंगळे

नाशिक :  अशुभ मानला गेलेला काळा रंग आडगावच्या शेतकऱ्यासाठी मात्र चांगलाच फायद्याचा ठरत आहे. हा शेतकरी कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय करून सक्षम होत आहे. आडगावच्या संदीप सोनवणे यांचा १०० कोंबड्यांपासून सुरू झालेला कडकनाथ कोंबडीपालनाचा व्यवसाय २० कोंबड्यांपर्यंत पोचला आहे. केवळ अंडी, चिकन विक्रीवर न थांबता त्यांनी विविध प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित उत्पादने विकसित केली. पारंपरिक स्टोअर्ससह ई कॉमर्स व्यासपीठांचा योग्य वापर,  व्यावसायिकता आणि नावीन्यपूर्ण संकल्पना यातून कडकनाथ कोंबडी व्यवसायाला नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यांची यशोगाथा एकदा वाचाच...

अगदी उदरनिर्वाहासाठी रिक्षाही चालवली.
मुळचे लोहणेर (ता. देवळा) येथील रहिवासी असलेले संदीप सोनवणे हे वयाच्या १८ व्या वर्षी १९९१ मध्ये नाशिकला आले. वडिलांच्या अपघाती निधनामुळे कमी वयातच कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. रोजगाराची मिळेल ती संधी आपली मानली. अगदी उदरनिर्वाहासाठी रिक्षाही चालवली. २००४ मध्ये बांधकाम व्यवसायात हात घातला. त्यात यश येत गेले. मात्र शेतकरी कुटुंबातील असल्याने शेती व पूरक उद्योगाची आवड होतीच. दरम्यान २०१३ मध्ये तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या निवासस्थानी संदीप यांनी कडकनाथ पक्षी पहिला. त्याच्या अंडी व मांस यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्याविषयी कुतूहल निर्माण झाले. जिज्ञासू वृत्तीने सखोल माहिती इंटरनेटवरून मिळविली. या पक्ष्यांचा मूळ अधिवास असलेल्या झबुआ (मध्य प्रदेश) येथे भेट देऊन माहिती घेतली. अभ्यासातून पुढे हा व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. २०१५ मध्ये सुमारे २ लाख रुपये गुंतवणूक करत छोटे शेड व १०० पक्ष्यांपासून सुरुवात केली. अन् आज त्यांच्याकडे २० हजार कडकनाथ पक्षी आहेत

कामकाजात सातत्यपूर्ण बदल
अन्य पोल्ट्री व्यवसायापेक्षा कडकनाथ कोंबडी पालन हा व्यवसाय उत्पादन खर्च, मेहनत व उत्पादन या अंगाने वेगळा आहे. पक्ष्यांची पिले आणल्यानंतर पुढे साधारण सहा महिन्यांनंतर अंडी उत्पादन सुरू झाले. या अंड्यातील उपलब्ध घटक तपासण्यासाठी अंडी प्रयोगशाळेत पाठवली. मात्र तपासणीत काही घटक कमी निघाल्याने गांभीर्याने त्याची कारणे शोधली. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खाद्यनिर्मितीत सोयाबीन, फिशमिल, मका यांसह खनिजे अशी विविध १८ नैसर्गिक घटक मिसळून खाद्य तयार करून दिले. नंतर पुन्हा अंडी प्रयोगशाळेत तपासली असता अपेक्षित घटक उपलब्ध असल्याचे दिसून आले. यातून त्यांचा आत्मविश्‍वास वाढला.

ई-कॉमर्सचा अवलंब; आव्हाने स्वीकारून यशस्वी मार्केटिंग 
ब्रॉयलर अंडीच्या तुलनेत कडकनाथ अंड्यांचा दर अधिक आहे. परिणामी, ग्राहकांची मागणी कमी राहत असल्याने अंडी विक्रीमध्ये अनेक अडचणी आल्या. मात्र संदीप यांनी अनेक ग्राहकांना सॅम्पल अंडी देऊन यांचे महत्त्व पटवून दिले. विक्रीसाठी मार्केटिंगची खास यंत्रणा उभारली. त्यातून प्रामुख्याने मुंबई शहरात ग्राहकांचे जाळे विणले गेले. हीच बाब त्यांच्यासाठी मोठी जमेची ठरली. मागणी व वेळेवर पुरवठा होऊ लागल्याने ग्राहकांनी त्यास पसंती दिली. पुढे नाशिक व मुंबई येथे स्वतंत्र विक्री दालने उभारली. यासह ‘ई-कॉमर्स’ पद्धतीचाही अवलंब ते करू लागले. त्यातून विक्री हळूहळू वाढत गेली.

अंड्यापासून भुकटी निर्मितीचा प्रयोग
कडकनाथ अंड्याची टिकवणक्षमता अवघी ७ दिवस आहे. यात प्रामुख्याने हिवाळा व पावसाळा वगळता उन्हाळ्यात मागणी कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात शिल्लक राहणाऱ्या प्रति दिन सुमारे २ हजार अंड्यांचे करायचे काय, हा प्रश्‍नच होता. यावर सलग सहा महिने संशोधन करत अंड्यापासून भुकटी निर्मितीचा प्रयोगही केला. भुकटीची साठवणक्षमता योग्य वातावरणात ६ महिन्यांपर्यंत आहे. यामुळे उन्हाळ्यातील शिल्लक राहणाऱ्या अंड्यांची समस्या व जोखीम कमी झाली. हा प्रयोग सिद्ध झाल्यानंतर आणखी प्रक्रिया उत्पादनांची मालिका नावारूपाला आणली.


नावीन्यपूर्ण प्रक्रिया उत्पादनांची शृंखला 
निम्म्या अंड्यांची थेट विक्री, तर निम्म्या अंड्यांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन असे संदीप यांच्या उत्पादनांचे सूत्र ठरले आहे. प्रक्रियेतून अंड्यापासून भुकटी तयार केल्यानंतर त्यांनी ‘रेडी टू कुक’ पद्धतीने मसाला मिश्रित ऑम्लेट व प्रोटीन पावडर अशी दोन प्रमुख उत्पादने विकसित केली. ही उत्पादने सहा महिन्यांपर्यंत टिकतात. यासह कडकनाथ नर कोंबड्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या ‘मिलेनिअम’ धातूचे संकलन केले जाते. त्यापासून बलवर्धक भुकटी ‘ब्लॅक व्हीगर’ नावाने बाजारात आणली. याच्या शासकीय प्रयोगशाळेतून चाचण्या घेतल्या असून, पेटंट मिळवले आहे. यासह कडकनाथ कोंबडीचे ताजे व ‘फ्रोझन’ पद्धतीने पिशवीबंद मांस विक्री केली जाते. ज्याची टिकवणक्षमता ९० दिवस आहे. पक्ष्यांची अंडी देण्याची क्षमता संपल्यानंतर या कोंबड्यांच्या मांसापासून प्रक्रियायुक्त पाळिव प्राण्यांसाठी खाद्य (पेटफूड) बाजारात आणले आहे.

ई-कॉमर्स व्यासपीठावर विक्री 
सुरुवातीला मुंबईत थेट पद्धतीने अंडी विक्रीची व्यवस्था बसवली आहे. त्या अंडी विक्रीसाठी ई कॉमर्स व्यासपीठांचा अवलंब सुरू केला. आज फ्लिपकार्ट, ॲमेझॉन या ई-कॉमर्स व्यासपीठावरून त्यांच्या उत्पादनाला ‘अ’ वर्ग श्रेणी आहे. या व्यासपीठावर दररोज सुमारे २ हजार अंडी व ५० ते १०० किलोपर्यंत चिकन विक्री होते. रेडी टू कुक ऑम्लेट ४०० ते ५०० पॅकेट विकले जातात. 
यासह नेचर बास्केट, फूड हॉल, इझी डे क्लब यांच्या माध्यमातून सुमारे १०० स्टोअर्समध्ये देशभरात अंडी बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे दिल्ली, कलकत्ता, चेन्नई या महानगरांसह पुणे, बंगळूर, अहमदाबाद या मोठ्या शहरांमध्ये मागणी वाढली. प्रामुख्याने आखाती देशांमधील दुबई, कतार, शारजाह येथे अंडी व चिकन निर्यातीस मोठी मागणी असते.
बदलत्या बाजारपेठेमध्ये आकर्षक ब्रँडिंग उत्पादने विक्री वाढीसाठी नावाची वेबसाइट तयार केली आहे. यासह ‘kadaknath७७’ नावाने सोशल मीडियावर फेसबुक, यू-ट्यूब, ट्विटर, इन्स्टाग्राम या माध्यमांद्वारे उत्पादनांचा प्रसार ते करतात. यासोबतच ग्राहकांना आकर्षित पॅकेजिंग, ब्रँडिंग केले आहे.

वेबसाइटद्वारे विक्रीसाठी आवश्यक जनजागृती

प्रीमियम व इकॉनॉमी प्रकारात अंडी विक्री केली होते. यासह सण, उत्सव या धर्तीवर भेट देण्यासाठी ‘कडकनाथ हेल्थी प्रीमिअम गिफ्ट बॉक्स’ संकल्पना सुरू केली. यातून दिवाळी व रमझान सणांच्या खास बाजारपेठेमध्ये शिरकाव केला आहे. यास अनेक सेलिब्रिटी व ग्राहकांनी आगाऊ मागणी करून पसंती नोंदविली आहे. बदलते मार्केटिंग ट्रेंड अभ्यासून आपल्या उत्पादनामध्ये नावीन्यपूर्णता आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडकनाथ अंडी व चिकनला मागणी होती. मात्र, विक्रीसाठी आवश्यक जनजागृती वेबसाइटद्वारे केली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT