नाशिक

Kalaram Mandir: पंतप्रधान मोदी आज करणार काळाराम मंदिरात आरती; असा आहे मंदिराचा इतिहास

PM Modi In Nashik : माधवराव पेशवे यांच्या मातोश्री गोपिकाबाई पेशवे यांचे त्याकाळी पुण्याहून नाशिकला येणे जाणे होते

Chinmay Jagtap

Kalaram Mandir: नाशिक मध्ये आज होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येणार आहेत.

नाशिकच्या या दौऱ्यात पंतप्रधान मोदी  श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन आणि पूजा करून महाआरती करणार आहे. मात्र काळा राम मंदीराच इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

तर प्रभू रामचंद्र, लक्ष्मण व सीतामाईने संपूर्ण चौदा वर्षांच्या वनवासातील कालखंडातील मोठा काळ सद्याच्या राममंदिर परिसरात म्हणजे पंचवटीत व्यतित केल्याची आख्यायिका आहे. पूर्वी याठिकाणी श्रीरामाचे लाकडी मंदिर होते. माधवराव पेशवे यांच्या मातोश्री गोपिकाबाई पेशवे यांचे त्याकाळी पुण्याहून नाशिकला येणे जाणे होते.

पंचवटीतील ज्याठिकाणी प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य होते, त्याचठिकाणी श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्याचा ध्यास गोपिकाबाईंनी घेतला. त्यांनी ही जबाबदारी माधवरावांचे मामा व ओढा येथील पेशव्यांचे संस्थानिक सरदार रंगराव ओढेकर यांच्याकडे सोपाविली. त्यानंतर हे भव्य मंदिर आकारास आले. त्यासाठी सहा वर्षांचा काळ लागला. मंदिरासाठी लागणार दगड रामशेज किल्याजवळून आणण्यात आला.

मंदिराची लांबी ८४ मीटर तर रुंदी ३२ मीटर आहे. मंदिराला मुख्य चार दरवाजे असून मंदिराच्या आवारात आकर्षक पद्धतीने बांधलेल्या चौ-यांशी ओव-या आहेत. मंदिरावर जमिनीपासून ६९ फूट उंचावर सोन्याचा कळस आहे. नागर शैलीतील या मंदिराच्या बांधकामाला १७८२ ला प्रत्यक्ष प्रारंभ झाला. सहा वर्षांत हे बांधकाम पूर्ण झाले.

मंदिरात प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मणाच्या काळ्या पाषाणातील दोन फूट उंचीच्या वालुकामय मूर्तींची स्थापना करण्यात आली. यावरूनच या मंदिराचे नाव श्री काळाराम मंदिर असे पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT