Kalidas Kala Mandir esakal
नाशिक

Kalidas Kala Mandir : पुणे, मुंबईच्या नाट्यगृहांपेक्षा ‘कालिदास’ महाग! भाडे कमी करण्यासाठी NMCला प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

Kalidas Kala Mandir : कलेचे अधिष्ठान असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहाचे भाडे पुणे, मुंबईतील नाट्यगृहांपेक्षा अधिक असल्याने महापालिकेने ५० टक्के भाडे कमी करण्याचा प्रस्ताव प्रसिद्ध सिनेअभिनेते प्रशांत दामले यांच्यासह नाशिकच्या नाट्य संस्थांनी दिला आहे.

महासभेत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असला तरी त्यात केवळ २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे नाट्यरसिकांमध्ये नाराजी पसरली आहे. (Kalidas more expensive than theaters of Pune Mumbai Proposal to NMC to reduce rent nashik news)

कोरोनाकाळात नाट्यगृहे जवळपास दोन वर्षे लॉकडाउन होते. त्यामुळे नाट्यक्षेत्रातील कलावंतांसह नाट्य संस्थेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कालांतराने नाट्यगृहे सुरू झाली. ५० टक्के आसन क्षमतेवर नाट्यगृहे सुरू झाल्यामुळे त्यांना ५० टक्के सवलत देण्यात आली होती.

मुंबई, ठाणे, कल्याणमधील नाट्यगृहांना अत्यल्प भाडे आहे. पुण्यात तर अवघे ५ हजार रुपये दर असल्यामुळे त्यांनी ही सवलत दिली नव्हती. पण नाशिक महापालिकेने दिलेली सवलतही काढून घेतल्यामुळे आता दिवसाला ६० ते ७० हजार रुपये भाड्यापोटी मोजावे लागतात.

अनामत रक्कमही वेगळी द्यावी लागते. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींचे कार्यक्रम या ठिकाणी होत नाहीत. नाट्य संस्थांनाही हे भाडे परवडत नसल्याने त्यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यामार्फत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घातले. त्यांनी महापालिकेला भाडे कमी करण्याची सूचना केली.

त्यामुळे आता २५ टक्के सवलत देण्याचा विचार महापालिकेने केला आहे. महासभेने त्याला अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे ही सवलतही अमलात आलेली नाही. कलाकारांना ५० टक्के सवलत अपेक्षित आहे. पण ‘दुधाची तहान ताकावर’ भागविण्याची वेळ या कलावंताना आली आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

पत्रात काय म्हटले?

कोरोनाच्या काळात नाट्यगृह दोन वर्षे बंद होती. कालांतराने ५० टक्के आसन क्षमतेवर ती सुरू झाली. नाट्यगृहे पूर्ण क्षमतेने सुरु असली तरी या दोन वर्षात नाट्य व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले आहे. ते पुढील पाच वर्षात भरून येणे शक्य नाही.

त्यामुळे नाशिक महापालिकेने नाट्यगृहाच्या भाड्यात ५० टक्के सवलत दिली होती ती डिसेंबर २०२२ पर्यंत लागू करावी. (ही सवलतही महापालिकेने दिलेली नाही.) तसेच मुंबई, पुण्याच्या धर्तीवर कालिदास कलामंदिराचे २५ टक्के भाडे आकारावे, असाही प्रस्ताव प्रशांत दामले यांनी नाशिक महापालिकेला दिला.

भाडे पुढीलप्रमाणे

व्यावसायिक नाटक

सत्र........वेळ.............भाडे............
प्रथम..सकाळी ९ ते ११.....११,०८० रुपये
प्रथम...सकाळी ११ ते दुपारी ३.. ११, ०८० रुपये
द्वितीय...दुपारी ३ ते सायंकाळी ८...१४,२६० रुपये
तृतीय...रात्री ९ ते १२.३०...१६,५२० रुपये

अन्य कार्यक्रम

प्रथम..सकाळी ९ ते ११.....२३,००० रुपये.
प्रथम...सकाळी ११ ते दुपारी ३...२३, ००० रुपये
द्वितीय...दुपारी ३ ते सायंकाळी .८...२७,२०० रुपये.
तृतीय...रात्री ९ ते १२.३०...३१,००० रुपये

प्रायोगिक नाटकांचे प्रयोग

प्रथम..सकाळी ९ ते ११.....५३६९ रुपये.
प्रथम...सकाळी ११ ते दुपारी ३...५३६९ रुपये
द्वितीय...दुपारी ३ ते सायंकाळ ८...७१४० रुपये
तृतीय...रात्री ९ ते १२.३०...९५०० रुपये

शनिवार व रविवारी याव्यतिरिक्त अडीच हजार रुपये जास्त भाडे आकारले जाते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT