Actors of Workers' Welfare Center Tilak Chowk, Chalisgaon, performing scenes from the play "Kay Danger Vara Sutlai" at the drama festival organized by Kamgar Kalyan Mandal. esakal
नाशिक

Kamgar Kalyan Natya Spardha : आत्मभान जागविणारे ‘काय डेंजर वारा सुटलाय!’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनुभव येत असतो. याच अनुभवातून आत्मभान जागविणारी नाट्यकृती म्हणजे ‘काय डेंजर वारा सुटलाय!’. जयंत पवार लिखित आणि महेंद्र खेडकर दिग्दर्शित हे नाटक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६८ व्या नाट्य स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र टिळकचौक चाळीसगावतर्फे मंगळवारी (ता. ३) सादर झाले. (Kamgar Kalyan Natya Spardha Self conscious kay danger wara sutlay nashik news)

जीवनात काही गोष्टी साध्य करणे व्यक्तीच्या हातात असते, तर काही गोष्टी ठरवूनही असाध्य राहतात. अशीच कथा या नाटकातील नरहरी दाभाडे यांची. ज्याप्रमाणे दाताचा विमा काढला जाऊ शकतो, मात्र याच दाताला जर ठणक येत असेल तर त्याचा विमा काढता येत नाही. त्यामुळे आयुष्यात अनावश्यक बाबींची निरर्थक गर्दी होते, ज्याचा उपद्रव हा जाणवत राहतो.

या सर्व परिस्थितीतून विस्थापन आणि स्थलांतर या जगाच्या अविभाज्य ठरत असलेल्या गोष्टींच्या गाभ्याशी हे नाटक प्रेक्षकांना घेऊन जाते. एका निर्दयी व्यवस्थेचे विक्राळ रुप दाखवणारी ही संहिता प्रेक्षकांना आयुष्यातील महत्त्वपूर्ण बाबींवर विचार करायला लावते ही लेखकाच्या लेखणीची किमयाच आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

चंद्रकांत चौधरी, कांचन मराठे, सानिका नावरकर, पियुष चौधरी, सोनल चौधरी, ऋषभ मुनोत, पंकज बारी, नितीन देशमुख, चंचल धांडे, महेंद्र खेडकर, सुनील पाटील, दीपक निकम, प्रवीण चौधरी, परेश माळी गणेश सानप, राजेंद्र मिस्तरी, रमेश गोगणे, किरण पाटील, प्रद्युन्म शिरोळे या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या. नाटकाचे नेपथ्य सुदर्शन पाटील यांनी तर प्रकाशयोजना राहुल निंबाळकर यांनी साकारली. दिशा ठाकूर यांनी नाटकाला पार्श्वसंगीत दिले.

आजच नाटक

बुधवारी (ता. ४) कामगार कल्याण भवन सातपूरतर्फे ‘शीतयुद्ध सदानंद’ हे नाटक सादर होणार आहे. श्याम मनोहर हे नाटकाचे लेखक असून सचिन शिंदे दिग्दर्शक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT