Drama esakal
नाशिक

Kamgar Kalyan Spardha : रंगांच्या आड लपलेले रहस्य ‘फेंट’!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रंगांच्या जगतात काळ्या पांढऱ्याला किनार देत येणाऱ्या नवीन रंगाला प्रत्यक्षात कसे अनुभव येतील याचे व्यक्तिचित्रण दाखविणारी नाट्यकृती म्हणजे ‘फेंट’. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६८ व्या नाट्य स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र, संगमनेरतर्फे शनिवारी (ता. ७) हे नाटक सादर झाले.

राजकारण, समाजकारण, जातिवाद यासारखे अनेक मुद्दे अधोरेखित करणाऱ्या या नाटकाचे नाटकाचे लेखन चैतन्य सरदेशपांडे यांनी, तर दिग्दर्शन विक्रम क्षीरसागर यांनी केले. (Kamgar Kalyan Spardha secret hidden behind colors feint nashik news)

‘फेंट’ हे नाटक सुरू होते त्या विश्वात फक्त काळा आणि पांढरा हे दोनच रंग आहेत. हे रंग कोणत्या ना कोणत्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात. पडदा उघडताच प्रेक्षकांना रॉय या तिशीतल्या माणसाचं घर दिसत. वकिली व्यवसाय करत असलेला हा रॉय रंगांच्या शोधात आहे.

त्याची लाला नावाची बायको जी एक समाजसेविका आहे. ती त्याला वेळोवेळी रंगांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देते. दोघांमधले दुरावे आणि विचारांमधील फरक हे प्रत्येक प्रवेशात आणखी उलगडत जातात.

रंगारीच्या झालेल्या खुनाचे नेमकं रहस्य काय, यामध्ये शंकेची सुई नेमकी कोणावर न्यावी, रॉय, लाला की या सगळ्याच्या मागे असलेला आमदार काळे या रहस्यातच हे नाटक पुढे सरकत जाते. रंगाऱ्याची बायको मुलगा सुद्धा यात भरडले जातात.

थोडक्यात समाजात असणारा जातिवाद आणि राजकारण या सगळ्यात सामान्य माणसाचं आयुष्य कसं भरडले जात, तसेच लोकांनी आपल्या सोयींसाठी प्रत्येक रंग धर्माची झालर लावून कसे वाटून घेतले त्याचा फायदा इतरांनी कशाप्रकारे करून घेतला याचा अनुभव प्रेक्षकांना हे नाटक पाहताना येतो.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

या नाटकात सानिका गायकवाड, अमोल बागूल, विक्रम क्षीरसागर, रवींद्र पाटील, श्रुती कापसे, असिफ या कलावंतांनी भूमिका साकारल्या. नाटकाला पार्श्वसंगीत वैभव- तन्मय यांनी दिले तर प्रकाश योजना ऋषिकेश कातड यांनी साकारली. पात्रांच्या रंगभूषा साक्षी गोयल तर वेशभूषा श्रुती कापसे यांनी साकारल्या. युवराज माळी यांनी नाटकाचे नेपथ्य केले. रंगमंच व्यवस्था शुभम चव्हाण यांनी हाताळली.

आजचे नाटक

रविवारी (ता. ८) ल. क. भवन, शाहू नगर वसाहत, जळगावतर्फे ‘जुगाड’ हे नाटक सादर होणार आहे. प्रदीप भोई या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

Latest Marathi News Updates: भारत पाक क्रिकेट सामन्याला विरोध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निदर्शने

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

MP Dhairyasheel Patil: उजनी प्रदूषणाबाबत केंद्र सकारात्मक, राज्य शासन उदासीन: खासदार धैर्यशील मोहिते-पाटील;'आगामी निवडणुका मविआ एकत्रितच लढणार'

Ayush Komkar प्रकरण पोलिसांची मोठी कारवाई, पण मास्टरमाईंड अजूनही फरार..| Andekar Toli | Sakal News

SCROLL FOR NEXT