Rajai Sinha, Sesharam Verma, Dr. Kapil Aher, Dr. Sudhakar More, Dr. Yuvraj Deore etc. esakal
नाशिक

Nashik News: कांचनगावचे उपकेंद्र सुविधांनी सज्ज! मोडकळीस आलेल्या इमारतीचे नूतनीकरण

एसबी आय कॅप्स आणि कंसर्न फाउंडेशनचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : एसबीआय कॅप्स आणि कंसर्न फाउंडेशनने कांचनगाव येथील मोडकळीस आलेल्या आरोग्य उपकेंद्रच्या इमारतीचे नूतनीकरण केले व आरोग्याच्या सर्व सुविधा केल्या आहेत. एसबीआय कॅप्स व कंसर्न फाउंडेशनने सीएसआर निधीतून ही कामे केली आहेत.

दरम्यान, रायगड, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांतील १५ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. (Kanchengaon sub center is ready with facilities Renovation of dilapidated building Nashik News)

माजी उपसरपंच सतीश गव्हाणे यांनी संबंधितांची भेट घेऊन मागणी केली होती. संस्थेने मोडकळीस आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे नूतनीकारण केले.

इगतपुरी येथील दोन आरोग्य उपकेंद्रे आणि एक प्राथमिक आरोग्य केंद्राला पायाभूत सुविधा, वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया उपकरणे, वैद्यकीय सेवेसाठी साहित्य दिले.

घोटी ग्रामीण रुग्णालयाला जवळच्या गावांना आपत्कालीन सेवा पुरविण्यासाठी टायप सी रुग्णवाहिका दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कांचनगाव आणि तळोघ आरोग्य केंद्रातील काम पूर्ण झाली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एसबीआय कॅप्सचे अध्यक्ष रजय सिन्हा, सीईओ शेषराम वर्मा, सीओओ डॉ. कपिल आहेर, डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. युवराज देवरे, संचालक अँना जॉय, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी एम. बी. देशमुख, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सोनाली कोळी, काळुस्ते केंद्रप्रमुख विजय पगारे,

मुख्याध्यापिका विश्रांती वेताळ, दत्ता साबळे, नामदेव साबळे, सुरेखा गुंजाळ, अनिता शिरसाट, सुनंदा जाधव, सुमित्रा खैरनार, सुधाकर बाविस्कर, उपसरपंच विजय चंद्रमोरे व ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. सोनाली कोळी यांनी सूत्रसंचलन व आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT