kargil warrior major deepchand  Sakal
नाशिक

परमवीर योद्ध्यांची नावे सार्वजनिक वास्तूंना का नाहीत?

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष होत आहे. आजपर्यंत २१ परमवीर योद्ध्यांनी देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. त्यांची नावे एखादी शाळा, महाविद्यालय, मेट्रो- रेल्वेस्थानक, विमानतळ यांना का देता आले नाही? अशी खंत कारगिल योद्धे मेजर दीपचं‍द यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केली. कारगिल युद्धात मला सहभागी व्हायला मिळाले, हे माझे परमभाग्य समजतो. दिवंगत सैनिकांच्या कुटुंबीयांचे समाजाने पालकत्व स्वीकारायला हवे म्हणून १५ ऑगस्टला नागरिकांनी जास्तीत जास्त सैनिकांच्या कुटुंबीयांना भेटून स्वातंत्र्य दिन साजरा करायला हवा, अशी अपेक्षाही मेजर दीपचंद यांनी व्यक्त केली.

मूळचे हरियानातील पंचग्रामी पाबडा (जि. हिसार) येथे १९७५ मध्ये जन्मलेल्या मेजर दीपचंद यांनी १९ व्या वर्षी सैन्यदलात प्रवेश केला. नाशिकच्या आर्टिलरी सेंटर येथे प्रशिक्षण घेऊन तोपची म्हणून काम केले. त्यानंतर हुसेनवाला बॉर्डर (फिरोजपूर) पंजाब येथे दोन वर्ष, त्यानंतर श्रीनगरला बारामुल्ला सेक्टर येथे गोपनीय विभागात काम केले. त्यांनी काश्मिरी भाषाही अवगत केली.

पहिला तोफगोळा डागला…

कारगिल युद्धाबाबत ते म्हणाले, ‘मुव्ह टू कारगिल’ लढाईला जाण्याचे फर्मान १९९९ मध्ये आले. त्यावेळी १८८९ बटालियन होती. शत्रूवर हल्ला करण्यासाठी श्रीनगर ते कारगिल ४८ तास पोचण्यासाठी दिले होते. मात्र २४ तासांत या ठिकाणी तोफा लावून तोलोलिंग डोंगरावर विजय मिळवला. मी मुख्य तोफ डागणारा तोपची होतो. पहिला गोळा दीपचंद यांच्या तोफेतून सुटला, दुश्मनाच्या डोक्यावर तोफेचा निशाना डागला व शत्रूचा नायनाट झाला होता. त्यावेळी अंदाजे दहा हजार गोळे तोफेतून फायर केले. याबद्दल नंतर १२ गॅलॅटरी अॅवॉर्ड मिळाले.

यशस्वी उपचारानंतर वाचलो

कारगिल युद्ध संपल्यानंतर तोफा लढण्यासाठी तयार करीत असताना बाँबगोळा भरताना दीपचंद यांच्या तोफेचा स्फोट झाला. त्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय आणि एक हात जखमी झाले. दुर्दैवाने दोन्ही पाय व उजवा हात निकामी झाल्यामुळे काढून टाकावा लागला. ७२ तासांच्या यशस्वी उपचारानंतर वाचलो, याचा आनंदही ते व्यक्त करतात. गेल्या वीस वर्षांपासून दीपचंद कृत्रिम पायांवर चालत असून, ते सैन्यदलाचे आयडॉल बनले आहेत. अनेक जखमी सैनिकांना ते समुपदेशन करतात.

आदर्श सैनिक फाउंडेशन

मेजर दीपचंद यांनी आदर्श सैनिक फाउंडेशन स्थापन केले आहे. जखमी सैनिकांचे प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. जवानांच्या मागे समाज आहे, असा गैरसमज आहे. सैनिक मृत झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. जखमी होऊन घरी बसलेल्या सैनिकांचे प्रश्न गहन होत चालले आहेत. त्यामुळे अशा सैनिक कुटुंबासाठी व सैनिकांसाठी आदर्श सैनिक फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली आहे. भारतभर सध्या ते प्रचार-प्रसार आणि जनजागृती करीत आहे.

आजही त्यांना भेटायला जातात

कारगिल युद्धात सैनिकांनी एकमेकाला वचन देताना, मी जर शहीद झालो तर माझ्या कुटुंबीयांकडे लक्ष ठेवा, त्यांना मदत करा अशी शपथ घेतली होती. मेजर दीपचंद यांचे निकटवर्तीय लान्सनायक मुकेशकुमार कारगिल युद्धात शहीद झाले. दीपचंद अजूनही त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला जाऊन त्यांच्या अडीअडचणी दूर करतात. कारगिल युद्धात शहीद झालेल्या इतरही जवानांच्या घरी दीपचंद भेटी देऊन सैनिकांच्या कुटुंबाचा आधार बनले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT