कौतिकराव ठाले पाटील Sakal
नाशिक

'संमेलनासाठी हिंडता फिरता अध्यक्ष निवडला पाहिजे' - ठाले पाटील

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा (Marathi Sahitya Sammelan 2021) उद्घाटन पार पडले असून संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर (Jayant Narlikar) हे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले (Kautikrav Thale Patil) पाटील यांनी खंत व्यक्त केली.

ठाले पाटील म्हणाले की, जयंत नारळीकर यांची प्रकृती ठीक नाही हे समजू शकतो पण जर ते किमान एक तास जरी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते तर सर्व रसिकांना आनंद झाला असता. या कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. ते म्हणाले, संमेलनासाठी हिंडता फिरता येणारा अध्यक्ष निवडला पाहिजे, शेकडो लोक आपल्याला पाहायला आले ही बाब लक्षात ठेऊन ते आले असते तर रसिकांना आनंदच झाला असता. जर भविष्यात अशी परिस्थिती ओढावली तरी दुसरा अध्यक्ष निवडण्यात यावा अशी तरतूद मंडळाच्या घटनेत असावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

3 डिसेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत नाशिक शहरात होत असलेल्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास संमेलनाचे मावळते अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान संमेलनाच्या आयोजकांकडून नारळीकर संमेलनाला यावेत यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले. पण नारळीकरांच्या कुटुंबियांनी प्रकृती आणि आताचे वातावरण या पार्श्‍वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RCB Live: ८ धावांत ६ फलंदाज बाद! भुवनेश्वर, हेझलवूडचा कहर! साहिलचा त्रिफळा उडाल्यावर विराटने काय केलं पाहा... Video

अमेरिकन लोक चीनमधून मागवत घर बांधण्याचं सामान! बाजारात ‘चायना होम्स’ची एंट्री; हा नवा ट्रेंड नेमका आहे तरी काय?

'मटका किंग'मध्ये एवढी मोठी चूक? नागराज मंजुळे विसरले पण प्रेक्षकांच्या नजरेतून नाही सुटली ती गोष्ट, म्हणतात- अरे...

Pune Domestic Violence Case: महिला पोलीस अंमलदाराचाच सासरकडून छळ; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik News : एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांकडून मृत्युपत्राची नोंद; ॲड. एकबोटे यांना ‘इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्स’तर्फे प्रमाणपत्र

SCROLL FOR NEXT