Raja Singh esakal
नाशिक

Nashik Crime: अपहरणातील अल्पवायीनचा मारहाणीत मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

सिडको : किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून राजा सिंग (वय १६, रा. स्वामीनगर) याचे अंबड गावातून रिक्षामध्ये घेऊन जात अपहरण करण्यात आले होते.

त्यास मारहाण करत असताना त्याचा मृत्यू झाला असून, तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Kidnapping minor beaten to death Nashik Crime)

२४ नोव्हेंबरला राजा सिंग याचे संशयितांबरोबर भांडण झाले होते. याचा राग मनात धरून २५ नोव्हेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास राजा सिंग यास अंबड गाव बसस्थानक येथून अपहरण करीत त्यास एका खडी क्रशर येथे नेऊन मारहाण करण्यात आली होती.

मारहाण करीत असताना त्याचा मृत्यू झाला. तो मृत झाला असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यास संशयितांनी राजूर बहुला परिसरानजीक करिश्मा हॉटेलनजीक फेकून दिले.

सकाळी आठच्या सुमारास गुरख्यास राजा सिंग मृत दिसून आल्याने वाडीवऱ्हे पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र राजा सिंग याचे वडील गब्बर सिंग यांनी अंबड पोलिसांत अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल केला होता.

याबाबत चौकशी करताना अंबड पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार सिंग याचे अपहरण करण्यात आले होते.

यातील संशयितांना ताब्यात घेतले असता, त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी केलेला मारहाणीत राजा सिंग याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली.

याबाबत अंबड पोलिस ठाण्यात संशयित आणि विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक वसंत खतेले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० लाखांचं पॅकेज, वर्क फ्रॉम; IT इंजिनिअरने आईला का संपवलं?

Pune Nashik Highway: पिंपळवंडीत तरुणाला मारहाण; कुकडी नदीच्या पुलावरून पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

SCROLL FOR NEXT