gulve patient.jpg 
नाशिक

"दोन्ही किडन्या निकामी...त्यात कोरोनासारखा भयंकर आजार..पण हार मानेल तो 'पठ्ठ्या' कसला!"

ज्ञानेश्वर गुळवे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / अस्वली स्टेशन : दोन्ही किडन्या निकामी... त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस उपचार सक्‍तीचा... त्यातच कोरोनासारख्या भयंकर आजाराची झालेली लागण... असे एक ना अनेक संकट असतानाही बेलगाव कुऱ्हेतील एका पठ्ठ्यावर आले, तरीही त्याने कोरोनाला चितपट केले. हे सगळं कसे शक्य झाले पण? वाचा सविस्तर

सर्वांनाच सुखद धक्का

उपचार, जगण्याची उमेद व सकारात्मकता याच्या बळावर 55 वर्षीय गेणू गुळवे यांनी कोरोनावर मात केली. त्याच उमदेपणाने ग्रामस्थांनीही त्यांचे गावात स्वागत केले. गेणू गुळवे या रेल्वे कर्मचाऱ्याने दोनच आठवड्यांत कोरोनावर मात करून सर्वांनाच सुखद धक्का दिला. शनिवारी (ता. 6) त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना संदर्भसेवा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनावर मात केल्याने त्यांचे ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. तर पत्नीने औक्षण केले. 
 
डायलिसिसचे उपचार घेत असताना लागण 
दोन महिन्यांपासून गुळवे यांच्यावर भायखळा येथील मध्य रेल्वेच्या विभागीय रुग्णालयात डायलिसिसचे उपचार सुरू होते. त्याचदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. 23 मेस चाचणी झाल्यानंतर 25 मेस त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आले होते. मात्र रुग्णालयाची परवानगी न घेता त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना थेट गावात आणले. गावात कोरोनाबाधित रुग्ण आल्याचे समजताच खळबळ माजली. बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांचे पथक त्यांच्या घरी हजर झाले. त्यांनी तत्काळ रुग्णास रुग्णवाहिकेद्वारे नाशिकच्या कोविड रुग्णालयात दाखल केले. दरम्यानच्या काळात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांना क्‍वारंटाइन करण्यात आले. मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 

अश्‍यक्‍य मुळीच नाही.

कोरोनाबाधित व्यक्तीने सकारात्मक पद्धतीने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास व उपचार घेतल्यास तो आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. दोन्हीही किडन्या निकामी झालेल्या रुग्णानेही कोरोनावर मात केली असल्याने ते अश्‍यक्‍य मुळीच नाही. - डॉ. जी. पी. बांबळे, वैद्यकीय अधिकारी, बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT