Shops decorated with attractive kites esakal
नाशिक

Nashik: संक्रांतीची चाहूल लागताच पतंगाची बाजारपेठ सजली! लहान- मोठ्या दुकानदारांची होलसेल व्यावसायिकांकडे गर्दी

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : संक्रांतीची चाहूल लागताच पतंगाची बाजारपेठ सजली आहे. विविध प्रकारच्या आकर्षक पतंग विक्रीस दाखल झाल्या आहेत. लहान- मोठ्या दुकानदारांकडून पतंग विक्रीसाठी होलसेल व्यावसायिकांकडे खरेदीसाठी गर्दी केली जात आहे.

अवघ्या महिनाभरावर संक्रांत येऊन ठेपली आहे. रविवारी (ता. १४) मकर संक्रांत साजरी होणार आहे. (kite market decorated Sankranti approaches Small and big shopkeepers flock to wholesale traders Nashik)

तरुण आणि लहान मुलांमध्ये संक्रांतीचे आकर्षण असल्याने बाजारात पतंग बाजारपेठ सजली आहे. जुने नाशिक, रविवार कारंजा अशा मुख्य बाजारांसह विविध ठिकाणी दुकाने थाटल्या आहेत.

विविध रंगी लहान मोठ्या आकारासह नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या तसेच लहान मुलांसाठी कार्टून पतंग विक्रीस उपलब्ध झाल्या आहे. १ इंचापासून ४२ इंचांची पतंग विक्रीस दाखल झाल्या आहे. पतंगांनी सजलेले दुकाने तरुण तसेच लहान मुलांचे आकर्षण ठरत आहे.

त्यांच्याकडून फावल्या वेळेत पतंग उडवण्याचा आनंद घेतला जात आहे. त्यानिमित्ताने किरकोळ विक्रीसही प्रतिसाद वाढला आहे. येत्या काही दिवसात यापेक्षाही अधिक आकर्षक आणि विविध सामाजिक संदेश देणाऱ्या पतंग विक्रीस येणार असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.

त्याचप्रमाणे कॉटन बरेली मैदानी, एसपी बरेली आणि पांडा मांजा तसेच लहान-मोठ्या फिरकीस मागणी असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. २ रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत पतंग आणि १२० पासून ते ३५० पर्यंत मांजा विक्री होत आहे. त्याचप्रमाणे १० ते १६० रुपयांपर्यंत फिरकीची विक्री होत आहे.

पतंग, मांजाचे प्रकार आणि दर

पतंग प्रकार दर

रामपूर स्पेशल...........५ ते २०

धोबी.................५ ते २०

प्लास्टिक कापड पतंग......२ ते ४०

कापड पतंग...........८० ते ३००

(कापडीमधील गरुड, घुबड, बारबी, विमान)

मांजा..................... दर (रीलमध्ये)

बरेली मैदानी..................१५०

एस पी बरेली..................१२०

पांडा ९ तारी..................१५०

पांडा १२ तारी..................२५०

पांडा १६ तारी..................३५०

फिरकी.......................१० ते १६०

"दुकानदारांची पतंग, मांजा माल खरेदीसाठी गर्दी होत आहे. किरकोळ विक्रीस प्रतिसाद वाढला आहे."- अमजद शेख, विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT