नाशिक

Nashik News : ‘महानिर्मिती’च्या निर्मितीत सुधारणा; राज्यात कोराडीचा वीजनिर्मितीत उच्चांक

नीलेश छाजेड

Nashik News : ‘ऑक्टोबर हिट’मुळे उन्हाची तीव्रता वाढली असून, त्याबरोबरच ‘महानिर्मिती’च्या वीजनिर्मितीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून येत आहे. कोराडीच्या ६६० च्या तिन्ही वीजनिर्मिती संचांनी उच्चांकी कामगिरी केली. (Koradi ranks highest in power generation in state news)

ओला व खराब कोळसा, काही भागात अल्प प्रमाणात पाऊस यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होऊन १३ हजारांवर क्षमता असलेली ‘महानिर्मिती’ची निर्मिती साडेपाच- सहा हजारांवर आली होती. उन्हाचा तडाखा वाढता असल्याने राज्याची विजेची मागणी २८ हजारांच्या घरात पोहोचली आहे.

आज दुपारी चारला राज्याची विजेची मागणी २८ हजार होती. एकट्या ‘महानिर्मिती’ची वीजनिर्मिती आठ हजार ९०१, तर खासगी वीज केंद्रांची आठ हजार ४३८ वॉट इतकी होती. नाशिक ३५१ वॉट, कोराडी १९००, खापरखेडा १०२९, पारस ३२७, परळी ५६२, चंद्रपूर १९९६, भुसावळ ९९३, उरण वायू प्रकल्प २६६, जलविद्युत ८५२, सौर ५१ वॉट, खासगीत जिंदाल ११३० वॉट, अदानी ३१७९, आयडीयल २५३, रतन इंडिया १३२१, एसडब्ल्यूजीपीएल ३३८ व इतर मिळून आठ हजार ४३८ वॉट इतकी वीजनिर्मिती सुरू होती. केंद्राकडून नऊ हजार वॉट हिस्सा वीज घेऊन गरज भागवली जात होती.

पाच दिवसांवर नवरात्रोत्सव आला असून, दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढती राहील, यात शंका नाही.

पावसाळ्यात शेती व्यवसायाची मागणी तसेच घरगुती पंखे, वातानुकूलन यंत्रे, कूलरसाठी विजेची मागणी कमी होते. पावसाळ्यात जलविद्युत केंद्रांना पूर्ण क्षमतेने चालवून औष्णिक संच टप्प्याटप्प्याने वार्षिक देखभाल व दुरुस्तीसाठी काढले जातात. परंतु, यंदा विजेच्या वाढत्या मागणीमुळे अनेक ठिकाणी वार्षिक देखभालीची कामे प्रलंबित आहेत.

ऑक्टोबरमध्ये कोराडीचा निर्मितीचा उच्चांक

कोराडीची टप्पा दोनची वीजनिर्मिती क्षमता ४७.५२ मिलियन युनिट्‍स आहे. शुक्रवारी (ता. ६) उच्चांकी निर्मिती ४३.७२ मिलियन युनिट्स होती. मागील उच्चांकी वीजनिर्मिती ४३.६९६ मिलियन युनिट्स होती. मंगळवारी (ता. १०) संच आठ क्षमता ६६० हा ६६५ वॉटने, संच नऊ- ६१६, तर संच १० पूर्ण क्षमतेने ६६० वॉटने सुरू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT