hospitals 123.jpg 
नाशिक

कोरोना काळात कुठं "वेटिंग' तर‌ कुठं पॅकेजचा फंडा...खाजगी रुग्णालयाच्या दुकानदारीवर कुणाचा वरदहस्त?

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना महामारीच्या काळात खासगी रुग्णालयांची दुकानदारी जोरात सुरू आहे. रुग्णाला उपचारासाठी दाखल करायचे झाल्यास पाच ते दहा लाखांपर्यंतचे पॅकेज सांगितले जाते. दुकानदारीला साठमारीची जोड म्हणजे, रुग्णांना कुठं "वेटिंग'वर आहात म्हणून सांगितले जाते, तर कुठं पाच लाखांच्या "ऍडव्हान्स'चा फॉर्म्युला सांगितला जातो. प्रशासनाकडून मात्र या प्रकारांकडे सोयीस्कर डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे या दुकानदारीला कुणाचा वरदहस्त आहे का, असा प्रश्‍न नाशिककरांना पडला आहे. 

कुठं "वेटिंग'चा अन्‌ कुठं पाच लाखांच्या "ऍडव्हान्स'चा फॉर्म्युला 

रुग्णसेवा करताना लागण झालेल्या एका डॉक्‍टरांची व्यथा याबाबत अत्यंत बोलकी आणि एकूणच वैद्यकीय पेशाला काळिमा फासणारी ठरावी. त्यांना दाखल होताना पंधरा दिवसांचे सहा लाखांचे बिल सांगण्यात आले. अतिदक्षता विभागात दाखल असले तरी ऑक्‍सिजन अथवा इंजेक्‍शनची आवश्‍यकता भासली नाही. नवव्या दिवशी डिस्चार्जवेळी त्यांच्या हातात तीन पानांचे, अडीच लाखांचे बिल देण्यात आले. फक्‍त गोळ्या व जेवणासाठी इतके बिल कसे झाले, या धक्‍क्‍यातून बिलांची पाने चाळली तेव्हा लक्षात आले, की डॉक्‍टरांच्या एका व्हिजिटसाठी दीड हजाराचे शुल्क आकारले गेले आहे. त्यांच्या व्हिजिटसाठी ती लावली, त्यातील काहींनी तर फोनवरूनच विचारणा, तर काहींनी बेडजवळ न येता लांबून चौकशी केली होती. त्याशिवाय, रुग्णालयाकडून खोलीभाडे, खाट, जेवण आणि औषधांचा खर्च दिवसाला 27 हजारांहून अधिक लावण्यात आला होता. 

अतिदक्षता विभाग टाकसाळ 
खासगी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभाग जणू रुग्णालयांसाठी टाकसाळ बनली आहे. या कक्षात मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा असते. रुग्ण स्नान करत नाही. त्यामुळे अनेकांचा कफ घट्ट होतो. काहींना ऑक्‍सिजन सॅच्युरेशन कमी व्हायला लागते. मग ऑक्‍सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण सांगत शंभर टक्के ऑक्‍सिजन तोही हाय डेन्सिटीने (कुठं हाय फ्लोने म्हणतात) दिला जात असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाइकाला दिली जाते. अशा यंत्रणांची फारशी माहिती नसलेले नातेवाईक मान हलवण्यापलीकडे काही करू शकत नाहीत आणि मग पैसे उकळण्याच्या गिरमीटचा वेग वाढतो. पीपीई कीट, हॅंड ग्लोज, सॅनिटायझेशन इतक्‍या खर्चाचा भुर्दंड रुग्णांच्या माथी मारला जातो. एरवी दिवसातून एकदा अथवा दोनदा द्यावा लागणारा नर्सिंगचा "चार्ज' काही ठिकाणी दिवसातून तीनदा उकळला जातोय. 

परवानगी उद्या येणार आहे 
कोवीड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नेमकी कोणत्या रुग्णालयांना आहे, त्यावर कोणाची देखरेख आहे, याबद्दल गोंधळाचे वातावरण आहे. एका डॉक्‍टरांनीच परवानगी नसताना रुग्णांना ठेवण्यात आल्याबद्दल विचारले असता संबंधित रुग्णालयाने उद्या परवानगी मिळणार आहे, असे सांगून वेळ मारून नेली. ती बतावणी पंधरा दिवसांपासून चालली आहे. यावरून स्पष्ट व्हावे, की खासगी रुग्णालयांच्या दुकानदारीचे पाश यंत्रणांच्या किती मुळापर्यंत पोचले आहेत. 


लुटीच्या भन्नाड आयडियांचा खजिना 
- कमी पॅकेजच्या रुग्णालयात उपचारासाठी पुढचा रुग्ण आल्याशिवाय पहिल्या रुग्णाला सोडले जात नाही 
- परदेशातून मागवलेले इंजेक्‍शन टोचल्याचे सांगितले जाते. सोबतच, ते लवकर यावे म्हणून तुमची काही व्यवस्था आहे, का असा साळसूदपणा दाखवला जातो. 
- रुग्णालयांना तक्रारींची भीती नाही. कोणत्याही स्तरावर प्रकरण दाबून टाकू, असा आत्मविश्‍वास संबंधितांना आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT