Officials of all religions and villagers performing collective Lakshmi Puja at Gram Panchayat office. esakal
नाशिक

Lakshmi Pujan: विखरणी ग्रामपंचायत कार्यालयात सामूहिक लक्ष्मीपूजन! हिंदू-मुस्लिम ऐक्य जपत दप्तर पूजन

सामुदायिक लक्ष्मीपूजनाची एकता: विखरणी ग्रामपंचायतमध्ये सामूहिक पूजन!

सकाळ वृत्तसेवा

येवला : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण. हा उत्साह अधिक द्विगणित करताना हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवत विखरणी ग्रामपंचायतमध्ये लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. (Lakshmi Pujan Collective Lakshmi Pujan at Vikharani Gram Panchayat Office Daptar Pujan preserving Hind Muslim unity nashik)

पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. मोहन शेलार यांच्या संकल्पनेतून विखरणी ग्रामपंचायतीने १३ वर्षांपासून लक्ष्मीपूजनाचा आगळा वेगळा आदर्श जगासमोर ठेवला आहे.

या वर्षीही विखरणी गावात मोठ्या उत्साहात दिवाळी सण सर्वधर्मीय ग्रामस्थांनी एकोप्याने साजरा केला. या परंपरेचा भाग म्हणजे सामुदायिक लक्ष्मीपूजन. रविवारी (ता. १२) सकाळी नऊला विखरणी ग्रामपंचायत कार्यालयात सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन सामुदायिक लक्ष्मीपूजन केले.

यामध्ये मुस्लिम बांधवांचा विशेष सहभाग होता. सकाळी ग्रामपंचायत कार्यालय सजवून, मंडप टाकून तसेच रांगोळी काढून सजविले होते.

लक्ष्मीपूजनानिमित्त सर्व जाती धर्माचे लोक ग्रामपंचायत कार्यालयातील एकत्र आले होेते. दप्तर पूजन, व्यवहारिक पारदर्शकता जपणारे येवला तालुक्यातील ही एकमेव ग्रामपंचायत असावी.

या कार्यक्रमास पंचायत समिती माजी गटनेते डॉ. मोहन शेलार, सरपंच ज्योती शेलार, उपसरपंच राधा पवार, सदस्य श्रावण वाघमोडे, मीनाताई पगार, जनार्दन गोडसे, जालिंदर शेलार, अशोक कोताडे, रवींद्र शेलार, लक्ष्मण रोठे, निवृती शेलार, दिलीप गोडसे, यशवंत गोडसे, वाळुबा शेलार, जगन्नाथ कदम, कौतिक पवार, अशोक बंदरे, काशिनाथ शेळके, ज्ञानेश्वर उशीर, नामदेव पगार, अरुण ठोंबरे, नागनाथ शेलार, दत्तू शेलार, यमाजी शेलार, राकेश शेजवळ, नितीन उशीर, किशोर ननवरे, साबीर शेख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"ग्रामपंचायत प्रत्येक गावाचे विकासाचे केंद्रबिंदू असून, गावाचा आर्थिक कणा आहे. ग्रामपंचायत गावाच्या एकोप्याने, पारदर्शकपणे राहिल्यास गावाचा विकास अधिक गतीने होतो. प्रत्येक गावकऱ्यास आपल्या ग्रामपंचायतीविषयी आत्मीयता असावी. आपल्या ग्रामपंचायतरचा कारभार पाहता यावा, या हेतूने आम्ही सर्वधर्मीय सामुदायिक लक्ष्मीपूजन सुरू केले. सर्वधर्मीय लोक एकत्र येऊन गावाच्या आर्थिक कारभाराचे पूजन करतात. एकत्र फराळ करतात. यामुळे गावात सलोखा टिकून राहतो."-डॉ. मोहन शेलार, उपाध्यक्ष, ३८ गाव पाणीपुरवठा योजना, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

SCROLL FOR NEXT