Lalit Patil Drug Case esakal
नाशिक

Lalit Patil Drug Case: पुण्यात सराफाची तर, नाशिकमध्ये प्रज्ञा कांबळेला आणून चौकशी; पुणे पोलिसांकडून मालमत्तेचा कसून शोध

सकाळ वृत्तसेवा

Nashik MD Drug Case : एमडी ड्रग्स् माफिया ललित पाटील (पानपाटील) याने ड्रग्सच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची माया जमविली आहे. या जमविलेल्या मायेचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र पिंजून काढला आहे.

याप्रकरणात गेल्या चारदिवसांपासून पुणे पोलिसांनी नाशिकच्या सराफाची पुण्यात कसून चौकशी सुरू आहे. तर, गुरुवारी (ता.२६) दपारी ललितची मैत्रिण ॲड प्रज्ञा कांबळे हिला नाशिकरोड परिसरातील तिच्या घरी आणून चौकशी केल्याचे समजते.

याबाबत पुणे पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली आहे. (Nashik MD Drug Case jeweller in Pune Pragya Kamble brought to Nashik for interrogation thorough search of property by Pune Police Crime)

नाशिकरोडच्या शिंदेगावात एमडी ड्रग्स्‌ची फॅक्टरी सापडल्यापासून नाशिकसह पुणे आणि मुंबई पोलिस ड्रग्स्‌चे रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी कसून तपास करीत आहेत.

पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर, खडबडून जाग आलेल्या पुणे पोलिसांनी उत्तरप्रदेशातून ललितचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांना अटक केली.

त्याच्या चौकशीतून पाटील बंधूंनी ड्रग्जच्या पैशातून विकत घेतलेल्या ३ किलोच्या सोन्याच्या विटा पुणे पोलिसांच्या हाती लागल्या. तसेच, त्यांनी मोठ्याप्रमाणात मालमत्ता खरेदी केल्याचीही शक्यता आहे.

याच चौकशीतून पुणे पोलिसांकडून गेल्या चार दिवसांपासून नाशिकमधील रेणुका ज्वेलर्सचे अभिजित दुसाने यास चौकशी सुरू आहे.

पाटील याच्याकडे सापडलेल्या सोन्याच्या विटा दुसाने याच्याकडून खरेदी केल्या होत्या. त्याची चौकशी सुरू असून यातून त्यांच्यात काही व्यवहार झाले असावेत असा पुणे पोलिसांना संशय आहे.

प्रज्ञाला नाशिकला आणले

ड्रग्स माफिया ललित पाटील याची मैत्रिण ॲड. प्रज्ञा कांबळे व अर्चना निकम या दोघींना पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली होती. ललित पुण्यातून पसार झाल्यानंतर नाशिकला आला होता आणि प्रज्ञा कांबळे हिने २५ लाख रुपये दिले होते.

त्यानंतर तो बंगळुरू मार्गे चेन्नईकडे गेला होता. याचप्रकरणी स्पॉटव्हिजीट करण्यासाठी पुणे पोलिसांनी संशयित कांबळे हिला नाशिकरोड येथील तिच्या ओनियन स्पेस या अपार्टमेंटमधील निवासस्थानी गुरुवारी (ता.२६) आणले.

याबाबत पुणे पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. तसेच तिच्या उपस्थितीमध्ये घराची झडतीही घेण्यात आली. यात पोलिसांच्या हाती काय लागले याची माहिती मिळू शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT