Nashik Lalit Patil  Esakal
नाशिक

Nashik Lalit Patil : ललित पाटील पुण्यातून नाशिकला गेला, महिलेकडून २५ लाख घेतले अन्...नेमकं काय घडलं?

ललित पाटील पुण्यातून फरार झाल्यानंतर नाशिकमधील एका महिलेला भेटला, 25 लाख रुपये घेऊन पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

एकावेळी मुंबई, पुणे आणि नाशिक पोलिसांना गुंगारा देत फरार असलेला अमली पदार्थ माफिया ललित पाटील याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असल्या तरी, पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर तो आधी नाशिकला आला. येथे एका महिलेकडून त्याला २५ लाख रुपये पुरविले गेले. ही २५ लाखांची रसद घेऊन तो राज्याबाहेर फरार झाला, असे आता तपासात पुढे येत आहे.

ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर नाशिक पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या ‘एमडी’ या अमली पदार्थाच्या गुन्ह्यातील तपासाला गती दिली. पाटीलचे ‘एमडी’ पोचविण्यात सहभाग असलेल्या संशयितांसह त्याला आर्थिक रसद पुरविण्यात सहभाग असल्याच्या संशयावरून एका महिलेला ताब्यात घेत तिच्याकडून ७ किलो चांदी हस्तगत केली. या महिलेवर ललितला २५ लाख रुपये दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे. आज पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी ही माहिती दिली.

महिलांचा सहभाग

पाटील बंधूंच्या टोळीमध्ये महिलांचा सहभाग असल्याचे पुढे येत आहे. वडाळा येथील छोट्या भाभीशिवाय ललितला फरार होण्यासाठी २५ लाख पुरविण्याच्या संशयावरून आर्थिक सूत्रधार महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. शिंदे गावातील कारखान्यात ५ किलो एमडी सापडण्याच्या प्रमुख गुन्ह्यात इतरांना अटक केली आहे.

चांदीऐवजी पैसे

पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर ललित नाशिकला आला. एकावेळी पुणे आणि नाशिक पोलिस मागावर असताना सगळ्या पोलिसांना गंडवित त्याला भूषण पाटील याने एका महिलेच्या मदतीने आर्थिक रसद पुरविली. चांदी देऊ केली असता ललित याने चांदीऐवजी २५ लाख रुपये घेऊन नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT