satish kulkarani 
नाशिक

वडाळा शिवारात कब्रस्तानासाठी होणार भूसंपादन; ६० कोटींची तरतूद करण्याचा निर्णय 

विक्रांत मते

नाशिक : मुस्लिमांच्या कब्रस्तानासाठी वडाळा शिवारात सर्व्हे क्रमांक ६३, ६४ व ६५ मध्ये आरक्षित जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय महापौर सतीश कुलकर्णी यांनी सोमवारी (ता. ७) महासभेत जाहीर केला. 

जागेसाठी ६० कोटी रुपयांची तरतूद

गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिमांच्या कब्रस्तानाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. दफनविधीसाठी जागा नसल्याने महापालिका मुख्यालयावर जनाजा आणण्याचे प्रकार यापूर्वी झाल्याने हा विषय संवेदनशील बनला आहे. वडाळा शिवारातील गौसिया मशिदीशेजारी असलेली जागा अपुरी पडत असल्याने जहाँगीर जहाँगीर कब्रस्तानमध्ये दफनविधी करावा लागतो. वाढत्या दफनविधीमुळे येथील जागाही अपुरी पडत आहे. त्यामुळे वडाळा शिवारातील सर्व्हे क्रमांक ६३, ६४ व ६५ मध्ये आरक्षित असलेल्या जागेचे संपादन करावे, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. या संदर्भात सोमवारच्या महासभेत भाजप नगरसेविका शाहीन मिर्झा यांनी वडाळा शिवारातील जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार कब्रस्तानाच्या जागेसाठी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय महापौरांनी दिला. 


महिला समिती सदस्यपदी भामरे 

महिला व बालकल्याण समितीच्या नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांपैकी भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदावर स्वाती भामरे यांची नियुक्ती महासभेत करण्यात आली. येत्या १० डिसेंबरला महिला व बालकल्याण समितीसह विधी, शहर सुधारणा, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य या चारही विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी निवडणुका होत आहेत. भामरे यांची महिला व बालकल्याण समितीवर सभापती म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. 

डॉ. आष्टीकर कार्यमुक्त 

ऑक्टोबरमध्ये आटोक्यात आलेल्या कोरोनाची दुसरी लाट येण्याची चिन्हे दिसत असताना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर दीड महिन्याच्या रजेवर गेल्याने त्यांना कार्यमुक्त करून शासन सेवेत पाठविण्याचा ठराव महासभेत करण्यात आला. महापौर कुलकर्णी यांनीदेखील वैद्यकीय विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करताना ७०० सफाई कर्मचारी नियुक्त केल्यानंतरही शहरात समाधानकारक सफाई दिसत नसल्याची खंत व्यक्त करताना आरोग्याधिकारी डॉ. कुटे यांना अल्टिमेटम दिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election साठी भाजप-शिवसेना एकत्र, पण राष्ट्रवादीचा उल्लेख नाही, जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला!

Dhurandhar Craze in Pakistan: पाकिस्तानात ‘धुरंधर’ पाहण्याची क्रेझ! बंदी असतानाही लोक कसे पाहतायत चित्रपट?

Kolhapur Property Survey : करवीर तालुक्यात ऐतिहासिक सर्वेक्षण; १३२ गावांतील ४० हजार मिळकतींना युनिक ओळख

Agriculture News : नाशिकमध्ये रब्बी पीकविम्याला थंडा प्रतिसाद! ४ लाख शेतकरी विम्यापासून दूर; काय आहे कारण?

Latest Marathi News Live Update : वर्धेच्या देवळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

SCROLL FOR NEXT