NMC esakal
नाशिक

NMC News : महापालिकेला दिलेला भूखंड प्रशासक, लिपिकांनीच विकला!

सिडकोच्या हस्तांतरित भूखंडाची परस्पर विक्री

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिडकोने नाशिक महापालिकेला हस्तांतरित केलेला भूखंड सिडको कार्यालयातील प्रशासकासह तिघांनी परस्पर तिसऱ्यालाच विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी नाशिकच्या सिडको कार्यालयातील तत्कालीन प्रशासक जी. व्ही. ठाकूर आणि लिपिक हर्षद हयात खान आणि ज्ञानेश्वर सोनवणे अशा तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (land given to NMC sold by administrators and clerks NMC News)

छत्रपती संभाजीनगर येथील सिडको कार्यालयातील प्रशासक संजय कुरे (५५) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार कुरे यांनी नाशिक सिडको कार्यालयात २६ ऑक्टोबर २१ ते १७ नोव्हेंबरदरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सिडको मुख्यालयातील अधिकारी संजय कुरे नाशिकला सिडको कार्यालयाच्या पाहणीसाठी आले होते. त्यांना सिडकोच्या नाशिक कार्यालयाने सर्व्हे क्रमांक ९२९ सेक्टर १४ बी नेबरहूड पॉकेट क्रमांक बी १४ हा ३७५९ चौरस मीटरचा प्लॉट नाशिक महापालिकेला हस्तांतरित केलेला असतानाही तत्कालीन प्रशासक जी. व्ही. ठाकूर, लिपिक हर्शद हयात खान या सिडकोचे नाशिकमधील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संगनमत करीत अधिकार नसताना ३२३७ च्या वाटप पत्राद्वारे ही जागा ज्ञानेश्वर सोनवणे यांना विक्री केल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

जागा होती सिडकोची, सिडकोने हस्तांतरित केली नाशिक महापालिकेला आणि तिघांनी विकली मात्र तिसऱ्याच व्यक्तीला असा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकारात सिडकोच्या संचालक मंडळाने ५७५९ क्रमांकाने ठराव करीत वाटपपत्र चुकीचे असल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

सिडकोच्या खात्यात जमा करण्यासाठी वापरलेल्या चलनावर खाडाखोड करीत ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या नावावर केले आहे. यात लिपिक ए. एच. खान यांनी संशयास्पद कामकाज करीत अधिकार नसताना भूखंड ज्ञानेश्वर सोनवणे यांना विकल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT