Air Pollution esakal
नाशिक

लखमापूर परिसरात वायुप्रदूषणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

रामदास कदम

दिंडोरी (जि. नाशिक) : तालुक्यातील लखमापूर फाटा परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीत आर.सी.फर्टिलायझर कंपनीच्या वायू प्रदूषणामुळे (Air Polution) तालुक्यातील परमोरी, ओझरखेड, अवनखेड परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदुषणचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने या परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या बाबत योग्य निर्णय न घेतल्यास या परिसरातील शेतकरी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

मंत्र्यांकडे मांडल्या व्यथा पण त्याचाही उपयोग नाही

याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या व्यथा मांडल्या आहेत. या परिसरातील कंपनीचे धुरांडे उंच करणे गरजेचे आहे. त्यामूळे या परिसरात प्रदुषण वाढणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
तालुक्यातील ओझरखेड, परमोरी, वरखेडा, अवनखेड आदी परिसरात या कंपनीच्या प्रदुषणामुळे शेतात असलेल्या विविध पिकांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे; पण याकडे कोणीही लक्ष देत नाही. प्रदुषण रोखण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. याबाबत येथील प्रांत अधिकारी, तहसिलदार, कृषी अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींना निवेदन देण्यात आले आहे. तसेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या भेटी घेऊन व्यथा मांडली परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही.

प्रदुषणामुळे शेतीचे मोठे नुकसान

गेल्या पंधरा वर्षांपासून या परिसरातील शेतकरी त्रस्त झाला असून शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या बाबत नुकतीच कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतात येऊन पाहाणी केली, त्यावेळी सदर कंपनीच्या प्रदुषणामुळे द्राक्ष वेली, भाजीपाला यांची पाने करपत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यावेळी सदर कंपनीच्या प्रदुषणामुळे ही पाने करपत असल्याने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून पिंकावर प्रदुषण करणा-या घटकांचा बंदोबस्त करावा असे सांगितले. पिकांचे पंचनामे करून सुद्धा काहीही उपयोग झाला नाही.
या परिसरात होणारे प्रदुषण त्वरित रोखावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा या परिसरातील शेतकरी गंगाधर निखाडे, ज्ञानेश्वर तिडके, शालिमार काळोगे, सदानंद शिवले, वाल्मिक काळोगे, रमेश जाधव, संतोष जमधडे,गोरख बोराडे, विष्णू पाटील, नरेंद्र जाधव, राकेश दिघे, रोशन दिघे, रमेश दिघे, संदीप काळोगे आदी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT