Tornado damage to vineyard
Tornado damage to vineyard esakal
नाशिक

Crop Damage : लासलगावला वावटळीने द्राक्ष बाग भुईसपाट; 10 लाखांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव (जि. नाशिक) : येथे दीड एकर सुपर सोनाका जातीची द्राक्ष बाग गुरुवारी (ता. ३०) वावटळीने भुईसपाट झाली आहे.

लासलगाव-कोटमगाव रोडवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा मार्केट जवळ येथील शेतकरी प्रल्हाद कमलाकर पाटील यांचा दीड एकर द्राक्ष बागेचे शेत आहे. त्यात त्यांचे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे. (Lasalgaon hit by wind and grape wineyard destroyed 10 lakhs loss nashik news)

द्राक्ष बागेचा द्राक्ष व्यापाऱ्याशी ५१ रुपये प्रतिकिलोने करार झालेला होता. परंतु, रामनवमीची सुट्टी असल्याने शुक्रवारपासून व्यापारी द्राक्षबाग काढणीला सुरवात करणार होते. अनेक संकटावर मात करत अचानक आलेल्या वादळाने दोनशे क्विंटल द्राक्षबाग भुईसपाट झाली. द्राक्षाची निर्यात होणारच होती तितक्यात वावटळीने पूर्ण बाग कोसळल्याने होत्याचे नव्हते झाले आहे.

अचानक आलेल्या वावटळीने भुईसपाट झालेला बाग उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु द्राक्षांचे वजन जास्त असल्याने बाग पुन्हा उभे करणे अशक्य झाले. निफाड तालुक्यात पंधरा दिवसांअगोदर आलेल्या अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

येथील शेतकरी प्रल्हाद पाटील यांच्या एसएसएन व्हरायटीचा द्राक्षबाग हार्वेस्टिंगच्या टप्प्यात असतानाच वावटळीच्या तडाख्यात सापडल्याने नुकसान झाले आहे. दोन दिवसापूर्वी व्यापारी बाग पाहून गेले होते.

द्राक्ष रशिया येथे एक्स्पोर्ट होणार होते. आता पूर्ण द्राक्ष बाग कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या कष्टाने द्राक्ष बाग वाढवली, फळ आता येण्याच्या मार्गावर असतानाच अस्मानी संकटांनी घाला घातला. यात संपूर्णतः द्राक्ष बाग उद्‌ध्वस्त झाल्याने पाटील यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT