College students jostle the bus after the Khedla bus arrives at the Vinchoor stop. esaka
नाशिक

Nashik News : लासलगाव-खेडला-झुंगे बसला ‘दे-धक्का’; महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव (जि. नाशिक) : प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी, गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी अशी बिरुदावली मिरविणाऱ्या लासलगाव आगाराच्या ढिसाळ नियोजनाचा फटका प्रवाशांना बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून लासलगाव आगारातून सुटणाऱ्या अनेक गाड्या उशिराने किंवा वेळेवर रद्द करण्यात येत आहे. तर अनेक नादुरुस्त गाड्या रस्त्यावर चालवून प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. (Lasalgaon Khedle Zunge Bus pushed by Students exercise to go to college Nashik Latest Marathi News)

गाव-खेड्यापर्यंत जाण्यासाठी महामंडळाच्या एसटी बसशिवाय पर्याय नाही. मात्र, लासलगाव आगाराच्या डेपोतून नादुरूस्त बस चालत असल्याची बाब समोर आली आहे. लासलगाव बस स्थानकातून लासलगाव-खेडला-झुंगे ही एसटी बस अर्धा किलोमीटर गावात येताच अचानक बंद पडल्याने कोटमगाव रोडवरील त्रिफुलीवर वाहतूक कोंडी झाली.

वाहतूक पोलिसांनी बस मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना धक्का मारण्यासाठी विनंती केल्यानंतर विद्यार्थी संकटकाळी प्रवेशद्वारातून बाहेर पडत एसटीला धक्का मारत बस रस्त्याच्या कडेला नेली. वाहतूक कोंडी फोडल्याने वाहतूक पोलिसाने सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांना नेहमीच बसला धक्के मारावे लागत असल्याने एसटी महामंडळाने खबरदारी म्हणून चांगल्या बसेस द्याव्या अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

लासलगाव व परिसरातील ४० हून अधिक गावातील नागरिक हे या बस स्थानकात येत असतात. आशिया खंडातील कांद्यासाठी प्रसिद्ध बाजारपेठ असल्याने परिसरातील गावातील हजारो नागरिक हे लासलगावमध्ये येत असतात. प्रवासाचे सुरक्षित माध्यम म्हणून नागरिक बसने प्रवास करतात. मात्र, येथे प्रवाशांच्या सोयींकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

प्रवासी आपल्या नियोजनानुसार बसस्थानकामध्ये येतात. बसची वाट पाहतात मात्र, लासलगाव आगाराकडून याबाबत कुठलीही सूचना न देता बस चालकाअभावी रद्द करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून लासलगाव आगाराच्या नियोजनाअभावी प्रवाशांना मनस्ताप करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT