The kidnappers and the mini van used were captured in CCTV footage from the bus stand here.
The kidnappers and the mini van used were captured in CCTV footage from the bus stand here. esakal
नाशिक

Nashik Crime News : लासलगावी तरुणाचे अपहरण, मारहाण; तिघांना अटक, एकजण फरारी

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव (जि. नाशिक) : येथे मुलीच्या प्रकरणातून झालेल्या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी बसस्थानकावर बोलावत तरुणाचे अपहरण करीत त्याला बेदम मारहाण करण्यात आली.

बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पोलिसांनी अवघ्या चार तासांतच संशयितांना शोधून काढत चार जणांना ताब्यात घेतले असून, तीन जण फरारी आहेत. आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. (Lasalgaon youth kidnapped beaten up Three arrested one absconding Nashik Crime News)

पोलिसांकडून सांगितलेली माहिती अशी ः येथे आठ दिवसांपूर्वी मुलीच्या प्रकरणात मुलीचे नातेवाईक अनिल दिनकर माळी याने गणेश माळी याला मारहाण केली होती. त्याचा राग धरत वचपा काढण्यासाठी गणेश माळी याने अनिल माळीला कविता नामक मुलीचा मोबाईल क्रमांक असल्याचे भासवत व्हॉट्सअॅपवर सतत तीन दिवस मेसेज केले.

त्यानुसार आज सकाळी लासलगाव बसस्थानकावर भेटण्यासाठी बोलवले. अनिल माळी व त्याचा मित्र पल्सरने (एमएच १५ बीक्यू ४३२६) बसस्थानकावर आले. ते उभे असताना अनिल माळी याला ओमिनी व्हॅनने (एमएच ०२, एव्ही १९०६) मधून आलेल्यांनी अपहरण करत लासलगाव रेल्वे गेटजवळील साईनगर येथे काटेरी झुडपात नेले. तेथे उतरून देत लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत सोडून दिले अन् पळ काढला.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना मिळताच बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॉमेऱ्याच्या मदतीने घटनेचा तपास सुरू केला. अवघ्या चार तासांत या प्रकरणाचा छडा लावण्यात लासलगाव पोलिसांना यश आले.

याप्रकरणी अनिल माळीने दिलेली फिर्याद आणि जबाबावरून अपहरण व दंगलीचा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात संशयित गणेश माळी (रा. नगरसूल, येवला), सौरभ ठाकरे (रा. नगरसूल, येवला) विशाल पवार (रा. नगरसूल, येवला), विठ्ठल गवळी (पिंपळगाव नजीक) यांना ताब्यात घेतले आहे. रवींद्र पवार (रा. नगरसूल, येवला), शंकर माळी (रा. नगरसूल, येवला) व विठ्ठल गवळी अद्यापही फरारी आहेत.

सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मारुती सुरासे, पोलिस कर्मचारी प्रदीप अजगे, कैलास महाजन, योगेश शिंदे तपास करीत आहेत. येवला तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी आणि हवालदार दौलत ठोंबरे यांनी मदत केली. फरारी तिघांचा लासलगाव पोलिस शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT