Kolhapur type dam overflowing near Vyaghreshwar temple after releasing its last circulation into the Mosam riverbed for drinking water from the dam at Haranbari (T.Baglan). esakal
नाशिक

Nashik News: हरणबारी धरणातून अखेरचे आवर्तन; मोसम खोऱ्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मोसम खोऱ्यातील गावांना भेडसावणाऱ्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हरणबारी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठीचे अखेरचे आवर्तन जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सोडण्यात आल्यामुळे मोसम खोऱ्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे. (Last avartan from Haranbari Dam Help to solve drinking water problem of villages in Mosam Valley Nashik News)

हरणबारी धरणातून मोसमनदी पात्रात यापूर्वी रब्बीसाठी दोनवेळा आवर्तन सोडण्यात आले होते. अखेरचे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असल्याने बागलाण व मालेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हरणबारी धरणातून पाणी सोडल्यामुळे बागलाण व मालेगाव तालुक्यातील सुमारे ८० टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे.

सुमारे १ हजार १६६ दशलक्ष घनफूट असलेल्या हरणबारी धरणावर बागलाणसह मालेगाव तालुक्यातील दीडशे गाव अवलंबून आहेत. मोसम खोऱ्यात गेल्या महिन्यापासून भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.

सार्वजनिक पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी ठप्प होऊन टँकरद्वारा गावांची तहान भागवावी लागत असे. पाणीटंचाईमुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मोसम खोऱ्यातील पाणीबाणीच्या संदर्भात अनेक ग्रामपंचायतींनी ठराव करून हरणबारी धरणातून तातडीने पिण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी धरणात शिल्लक साठ्यापैकी सुमारे तीनशे दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे. या आवर्तनामुळे मुल्हेर, अंतापूर, ताहराबाद, सोमपूर, जायखेडा, आसखेडा, द्याने, अंबासन, वड़नेर खाकुर्ड़ी, अजंग वडेल आदीं मोठ्या गावांना दिलासा मिळाला आहे. हरणबारीच्या आवर्तनामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पाटबंधारे विभागाचा इशारा

हरणबारीचे आवर्तन हे केवळ पिण्याच्या पाण्यासाठी असल्याने नदीकाठावरील शेतकऱ्यांनी वीज पंपाच्या साहाय्याने पाण्याची चोरी करू नये. तसेच मोसम नदीपात्रात पाणी अडविण्यासाठी बांध घालून अडथळा निर्माण करू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT