leopard.jpg 
नाशिक

बिबट्याच्या हल्ल्यात तिच्यासोबतच पोटातल्या जीवाचा 'असा' दुर्देवी अंत!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (अंबासन) येथील मोराणे शिवारात ह्रदय हेलावणारी घटना घडली. अक्षरश: ते दृश्य बघून अंगावर काटा येईल असा प्रकार...ती दोन जीवांची, पोटात निरागस जीव आणि त्याची नजर अशी फिरली की थेट जीवच घेतला...तिने केलेला प्रतिकार निरर्थक ठरला अन् शेवटी तिच्यासोबत तिच्या पोटातला जीवाचा देखील दुर्देवी अंत झाला. 

अशी आहे घटना

शेतकरी हरी कोर यांनी शेतात जनावरांसाठी गोठावजा कांदाचाळ तयार केली आहे. जनावरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चारही बाजूने लोखंडाची जाळी लावली आहे. शेतकरी श्री. कोर मुलांसह पहाटे शेतात गेले असता, त्यांना लोखंडी जाळी उचकटलेली दिसली व गोठ्यात बांधलेल्या गाभण शेळीला बिबट्याने ठार केल्याचे निदर्शनास आले. बिबट्याच्या मादीबरोबर चार बछडे असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ताहाराबाद वनपरीक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला असून, बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. श्री. कोर यांनी वनपाल बोरसे, आहिरे व राजेंद्र साळुंखे यांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. 

परिसरात अनेक वर्षांपासून बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. काही शेतकऱ्यांना बिबट्याच्या मादीबरोबर चार बछडे दिसून आले आहेत. बिबट्याचा मुक्तसंचार वाढल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT