Leopard Rescued esakal
नाशिक

Nashik : अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्या जखमी; वनरक्षकावर हल्ला

सागर आहेर

चांदोरी (जि. नाशिक) : नाशिक औरंगाबाद महामार्गावर चितेगाव फाटा चांदोरी दरम्यान टाकळी फाट्या नजीक गुरुवार दि. १० नोव्हेंबर रोजी रात्री ९. ३० वाजता एका भरधाव वाहनाने मादी बिबट्याला धडक दिली. या धडकेत मादी बिबट जखमी होऊन रस्त्यावर पडली होती. या मादी बिबट्याची तपासणी करायला गेले असता तिने निफाडचे वनरक्षक विजय माळी यांच्यावर हल्ला केला. दरम्यान वनरक्षकाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Leopard injured in collision with unknown vehicle Attack on forest guard at chandori Nashik Latest Marathi News)

टाकळी फाटा परिसराजवळील दुपदरी रस्ता ओलांडत असताना तिला अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. ही बिबट्या अजूनही जिवंत असल्याचे वाटसरुंच्या लक्षात आले.त्यांनी तात्काळ वनविभागला कळवले. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल अक्षय मेहेत्रे यांनी येथील वनरक्षक भगवान जाधव यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाचे कर्मचारी जवळ गेले असता, ही मादी बिबट्या रस्त्यालगत असलेल्या द्राक्ष बागेत जाऊन बसली.

या वेळी वनमजुर विजय माळी तपासणी करायला गेले, आणि या मादी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.वनक्षेत्रपाल अक्षय मेहेत्रे,वनपाल भगवान जाधव,विजय माळी,यांच्यासह नाशिक व निफाड येथील अधिकारी व कर्मचारी बिबट्या पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन रात्री १:३० वाजेपर्यंत करत बिबट्याला पकडले.आपत्ती व्यवस्थापन समितीचे सोमनाथ कोटमे,राजेंद्र पोरजे,दौलत टर्ले,वन्यजीव संरक्षण समिती सदस्य उपस्थित होते. दरम्यान बघ्यांची गर्दी झाल्याने सायखेडा पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांनी सौम्य बळाचा वापर करत गर्दी कमी केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT