leopard of Nilavandi Shivara finally jailed esakal
नाशिक

Nashik Leopard News: निळवंडी शिवारातील 'तो' बिबट्या अखेर जेरबंद

दिगंबर पाटोळे

वणी : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी शिवारात गेल्या पाच दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलगा मयत झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले होते.

अखेर अथक परिश्रमानंतर वनविभास निळवंडी परीसरातील 'तो' बिबट्या जेरबंद करण्यास अखेर यश मिळविले आहे. ‌(leopard of Nilavandi Shivara finally jailed Nashik News)

दिंडोरी तालुक्यात बिबट्याने थैमान घातले आहे. पाच दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका मेंढपाळावर हल्ला केला होता.

त्याचा तपास वन विभाग करत असतानाच त्याच दिवशी ता. ११ रोजी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास निळवंडी येथे आठ वर्षीय मुलगा गुरु खंडू गवारी हा पणती लावण्यासाठी गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याला उचलून नेले.

घराच्या मागच्या बाजूला उसाचे क्षेत्र असून त्या उसामध्ये बिबट्याने त्या मुलाला नेले शोध घेतला असता मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

गेल्या एक वर्षात ही दुसरी घटना असून मागील घटनेतही संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेतून घरी येत असताना एका शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला होता त्यात त्यालाही जीव गमवावा लागला.

दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणीसाठी आक्रमक पावित्रा घेतला होता.

तसेच या घटनेची वनविभागानेही गांर्भीयाने नोंद घेतली होती. उप वनसंरक्षक पूर्व भाग नाशिक उमेश वावरे, सहाय्यक वन संरक्षक पूर्व भाग नाशिक अनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी दिंडोरी श्रीमती पुजा जोशी, वनपाल अशोक काळे, रेंज मधील सर्व वनरक्षक स्टाफ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्नशील होते.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मागील सात दिवसांत केलेल्या प्रयत्नात आज शुक्रवार, ता. १७ रोजी निळवंडी शिवारात चिंच ओहोळ नाल्यात लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे.

हा बिबट्या मुलगा मयत झालेल्या घटनास्थळापासून 800 मीटरच्या अंतरावर जेरबंद करण्यात आला असून याच बिबट्याने मुलावर हल्ला केला आहे. परिसरात अजूनही बिबट्यांचा वावर असल्याने नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT