A leopard roaming around the premises of a bungalow caught on CCTV. esakal
नाशिक

गौळाणे येथे बिबट्याचे पुन्हा एकदा दर्शन; शेतकरी भयभीत

सकाळ वृत्तसेवा

गौळाणे (जि. नाशिक) : सिडको, ता. ८ : रविवारी (ता.७ ) रात्री साडेनऊ वाजता बिबट्याने गौळाणे शिवारातील शांताराम चुंबळे यांच्या बंगल्याच्या आवारात पुन्हा दर्शन दिल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वारंवार दिसणाऱ्या या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. चुंबळे यांच्या सीसीटीव्हीमध्ये रात्री नऊ वाजून ३२ मिनिटांनी या बिबट्याचा वावर कैद झाला आहे. (Leopard spotted again at Gaulane Farmers are scared nashik Latest marathi news)

याआधी २६ जुलै, नंतर 2 ऑगस्ट आणि रविवारी (ता. ७) रात्री नाशिक महापालिकेचे शेवटचे टोक असलेल्या या मळे वस्तीवर दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरामध्ये लागून असलेल्या अंबड एमआयडीसी परिसरात सायकल आणि दुचाकीद्वारे कामगार, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक मोठ्या प्रमाणात ये- जा करतात.

प्रत्येकाकडे गाई म्हशी असल्याने प्रत्येक व्यक्ती रात्रीच्या वेळेस घरात असली तरी घराच्या बाहेर असलेल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये काही ना काही कारणास्तव घराबाहेर यावेच लागते. गोठ्यामधील जनावरांकडे तेवढीच ओढ व जिव्हाळा या मंडळीला असतो.

शेतकऱ्यांसाठी गोठ्यातील जनावरे रोजीरोटीच आहे. पाळीव कुत्र्यांवरदेखील आतापर्यंत अनेक हल्ले झाले आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठीदेखील शेतकरी चिंतेत आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी परिसरातील सर्व शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे .

"परिसरात बिबट्याची दहशत असल्याने शेतकरी, कामगार, महाविद्यालयीन तसेच शाळकरी विद्यार्थी चिंतेत आहेत. सर्वांना स्वतःसह आपल्या जनावरांची आणि पाळीव प्राण्यांची चिंता आहे. त्यामुळे वनविभागाने गांभीर्याने या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तातडीने पिंजरा बसवून या बिबट्याला पकडणे गरजेचे आहे." - कैलास चुंबळे, माजी सरपंच, गौळाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT