Leopard  esakal
नाशिक

Nashik News : दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत! 2 दिवसापासून सलग दर्शन

सकाळ वृत्तसेवा

लखमापूर (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील म्हेळुस्के येथे बिबट्याने वासरावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी खेडले येथील शेतकऱ्याच्या गोट फार्ममधील शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करत तीन शेळ्या जखमी केल्या. सलग दोन दिवस बिबट्याने या परिसरात जनावरांना जखमी केल्याने परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे. त्यामुळे या भागांमध्ये पिंजरा बसविण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (Leopard terror in Dindori taluka Consecutive from 2 days Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

खेडले (ता.दिंडोरी) येथील शेतकरी अरुण मेधने हे आपल्या शेतात कुटुंबीयांसह राहतात. गुरुवारी (ता.२२) रात्री त्यांच्या शेतात असलेल्या गोटफर्म जवळ असलेल्या गवतामध्ये बिबट दबा धरुन बसला होता. रात्री आठला बिबट्याने गोट फर्ममध्ये घुसत शेळ्यांवर हल्ला केला. यात तीन शेळ्या जखमी झाल्या. यावेळी इतर शेळ्यांसह जनावरांनी मोठ्याने आवाज केल्याने अरुण मेधने हे घराबाहेर आले. त्यांनी आरडाओरड करताच बिबट्याने शेतात धूम ठोकली.

दिंडोरी तालुक्यात बिबट्यामुळे पशुधन धोक्यात आले असून बिबट्याकडून पाळीव प्राणी व पशुधनावर हल्ले होत असल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने तेथे त्वरित पिंजरा लावण्याची मागणी सरपंच उषा वाघ, नामदेव वाळके, रामराव मेधने, गंगाधर पवार, पांडुरंग गाडगे, बाजीराव वाळके, संभाजी मेधने, प्रदीप मेधने यांनी केली .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BR Shetty: एका रात्रीत नशिब बदललं; 880000000000 रुपयांची कंपनी फक्त 74 रुपयांना विकली; आता कोर्टाने ठोठावला 408 कोटींचा दंड

Diwali Sweets Alert: दिवाळीत खवा शुद्ध की भेसळयुक्त आहे कसा ओळखायचा? वाचा एका क्लिकवर

Kadamwakvasti fire: 'कदमवाकवस्ती येथील जेके सेल्सच्या गोडाऊनला भीषण आग; २ कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक..

Latest Marathi News Live Update : वाघोलीत कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

Belagav Bank Election : 18 मतदारांना नामांकित हॉटेलमध्ये ठेवले डांबून? मतदान केंद्रापर्यंत जाण्यासही अडवल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT