General Assembly In Malegaon esakal
नाशिक

Nashik : महासभेत प्रस्ताव कमी अन्‌ वादावादीच जास्त

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : महापालिकेतील (MMC) सत्तारुढ सदस्यांची मुदत १५ जूनला संपुष्टात येणार आहे. यामुळे आगामी जून महिन्यातील महासभा अखेरची व निरोपाची महासभा असू शकते. तत्पुर्वी बुधवारी (ता.११) झालेल्या महासभेत प्रस्ताव कमी अन्‌ सत्तारुढ व विरोधी गटात वादावादी व झोंबाझोंबीच जास्त अशी स्थिती होती. सभेत शहराला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या गिरणा पंपींग स्टेशनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होतो. कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या हेतूने गिरणा पंपींग स्टेशनसाठी किर्लोस्कर कंपनीचे चार पंप पंधराव्या वित्त आयोगांतर्गत खरेदी करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला. स्वच्छता, भुखंड खरेदी, मोकळे भुखंड शैक्षणिक संस्थांना देणे यासह विविध प्रश्‍नांवर सत्तारुढ व विरोधी गटातील सदस्यांमध्ये चकमक उडाली. (Less proposals and more debates in the General Assembly Nashik News)

महापौर ताहेरा शेख (Mayor Tahera Sheikh) यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी चारला राष्ट्रगीताने महासभेला सुरुवात झाली. अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, नगरसचिव श्‍याम बुरकुल सभास्थानी होते. ज्येष्ठ सदस्य माजी आमदार रशीद शेख यांच्याशी एमआयएमचे नगरसेवक माजीद युनूस ईसा व जनता दल नगरसेवक मुश्‍तकीम डिग्निटी यांनी केलेला वाद चर्चेत राहिला. महासभेत झालेल्या वादात दोघांनी एकमेकांवर वैयक्तिक टिपाटिपणी केली. सुदैवाने हा वाद विकोपाला गेला नाही. अन्यथा महासभेत बिकट स्थिती झाली असती. आरोग्य, स्वच्छता, पाणीप्रश्‍नी व गॅरेज विभागातील नादुरुस्त वाहने, वॉर्डनिहाय स्वच्छतेसाठी जेसीबी न मिळणे, नाले सफाई या मुद्द्यावरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

स्वच्छतेच्या मुद्यावरुन काही सदस्यांनी वेलमध्ये बस्कन मारली. जमीन भूसंपांदनाचे पाच प्रस्ताव तहकूब करण्यात आले. स्थानिक वरीष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा ठरावही तहकूब करण्यात आला. रामलिला मैदान भागात बगिचा, लॅन्ड स्केपिंग व गिरणा नदीला घाट यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे दोन कोटीचा प्रस्ताव पाठविण्याचा सुनील गायकवाड यांचा ठराव मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव पाठवितानाच शासनाकडून ही जमिन मिळावी हा प्रस्तावही पाठवावा अशी सूचना सखाराम घोडके यांनी केली. विविध संस्था, संघटनांना रेडीरेकनर दराप्रमाणे समाजोपयोगी व स्वयंसेवी कामांसाठी मोकळे भूखंड देणे, विविध चौक, रस्त्यांना नाव देण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आले. महापालिकेत नव्याने आलेले अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त सतिश दिघे, सुहास जगताप, सहाय्यक आयुक्त हेमलता डगळे आदींचा परिचय करुन देत महापौरांनी त्यांचे स्वागत केले.

चर्चेत रशीद शेख, सखाराम घोडके, सुनील गायकवाड, खालीद परवेज, अस्लम अन्सारी, जयप्रकाश बच्छाव, नंदकुमार सावंत, शानेहिंद निहाल अहमद, एजाज बेग, आशा आहिरे, मुश्‍तकीम डिग्निटी, माजीद युनूस ईसा, फकीरा शेख, गिरीष बोरसे, शेख कलीम दिलावर आदींनी सहभाग घेतला.

महासभेचा यापुर्वीचा ठराव रद्द

शहरातील विविध विकास कामांसाठी निविदा दाखल करताना मक्तेदारास सक्षम प्राधिकाऱ्यांकडून एनओसी घेणे बंधनकारक करण्याबाबतचा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव आजच्या महासभेत सर्वानुमते मंजुर करण्यात आला. काही महिन्यापुर्वी सत्तारुढ गटाने हा प्रस्ताव आणला होता. त्यावेळी यामुळे ठराविक मक्तेदारांनाच काम मिळेल असा आरोप करत बहुसंख्य सदस्यांनी त्यास विरोध केला होता. आज महासभेत चर्चेनंतर सर्वानुमते हा ठराव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Pune Crime : बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Radha Buffalo : साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद; जगातील सर्वांत ठेंगणी म्हैस म्हणून दखल

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT